24 तास पाणी, सुकर महामार्ग, विकास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपाला मत द्या
शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना या मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेगांवासीयांना आवाहनच केले आहे की, मागील निवडणुकीत भाजपाला बहुमत दिल्याने सर्व अडसर दुर करुन शेगांव शहराचे नंदनवन करण्याकरीता माझी सतर्कतेची भुमिका राहीली असून लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वचनाची पुर्ती मी सत्ताकाळ संपल्यानंतरही कुठलीच कसर ठेवली नाही. आणि शहराच्या विकासासोबतच समस्यामुक्त शहर करण्याकरीता भाजपा व मित्र पक्ष कटीबध्द आहोत.
शेगांव शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे ध्येय आता लवकरच साकारत असले तरी अनेकाविध योजनांच्या माध्यमातुन प्रभागाचा विकास, सामाजिक नेत्यांच्या कमानी आणि अन्य विकास कामाला प्राधान्य दिले आहे. शेगांव शहरातील वाहतुकीला आळा घालण्याकरीता नव्याने प्लॅन तयार करण्यात आला असून त्यासाठी शेगांव शहरात नगराध्यक्ष भाजपाचा असावा. कारण केंद्रात आणि राज्यात असलेल्या महायुतीच्या माध्यमातुन शेगांव शहराचा विकास हे व्हिजन माझ्या डोळ्यासमोर आहे. मागील पाच वर्षातील विकास हा माझ्यावर व भाजपावर दिलेल्या बहुमाला अनुसरुन करण्याचा मी काटेकोरपणे प्रयत्न केला आहे.
ही बातमी वाचा – प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी
वाढत्या नागरीवस्त्यानुसार समस्या या एका दिवसात संपुष्टात येत नसल्याचे दिसून येत असले तरी वेळोवेळी उदभवलेल्या समस्या आणि त्याचे निराकारण करण्याकरीता सत्ता हवी आहे. विकासाच्या माध्यमातुन अनेक प्रभागातील विकास रस्ते, नाल्या, सांडपाण्याची व्यवस्था, शेगांव शहरातील भुयारी मार्ग, आणि अन्य कामाकरीता माझे प्राधान्य राहीले आहे. तरी पिण्याच्या पाण्यासाठी शेगांवकरांना सुखद अनुभव मिळत राहावा आणि अन्य योजनांची अंमलबाजवणी ही आमची ध्येय प्रणाली असल्याचे मत आ.डॉ.संजय कुटे यांनी यावेळी मांडली.
भाजपा व मित्र पक्षांच्या विविध प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन विकास साधला असला तरी काही भागात समस्या असल्या तरी त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. यावेळी निवडणुकीत नव्या चेहऱ्यासोबत अभ्यासु उमेदवारांनाही यावेळी निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरविण्यात आले आहे.
तरी यावेळी शेगांव शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता आपल मतं भाजपाला असावा आणि प्रभागासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवरांच्या माध्यमातुन कमळच फुलावं अस प्रतिपादन आ.डॉ. संजय कुटे यांनी आवाहन करीत विकासाकरीता भाजपा व मित्रपक्षाला मत देण्याचे जणु आवाहनचं केले आहे.
