पक्ष आणि पक्षश्रेष्ठी आपल्या सोयीनुसार करतात राजकारण
शेगांव- राज्यात आता कार्यकर्ता हा फक्त सतरंज्या उचलण्यापुरता आणि साहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, रावसाहेब, दादा इतक्यावर सन्मान ठेवण्यापुरता उरला आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांना संख्याबळ दाखविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मोठी अार्थिकता खर्च करावी लागत असल्याचे वास्तव्य पहावयास मिळते. तर पक्ष श्रेष्ठी यांना आता कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेतेचे काहीच देणेघेणे उरले नाही हे पण राज्यातील नुकत्याच सुरु असलेल्या घडामोडीतुन दिसून येत आहे.
राज्यात सद्या निवडणुकीचा धुमधडाका सुरु आहे. राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आता महानगर पालिका निवडणुकीची घोषणा सुध्दा करण्यात आली आहे. त्यामुळे नगर पालिकेचा कार्यभार अजुन नव नियुक्तांकडे दिलेला नसला तरी लगेच न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका आटोपण्यात याव्यात या आदेशाला अनुसरून निवडणुक आयेाग आणि त्यांच्या पाठोपाठ हे राजकीय पक्ष सुध्दा कामाला लागल्याचे चित्र आता राज्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांकरीता सर्वस्व असली तरी नुकत्याच झालेल्या निवडणुकामध्ये राजकीय पक्षांच्या जेष्ठ नेते यांच्या घरातील नातेवाईकाला निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असल्याने यावेळी सत्तेसाठी पक्षनेते निष्ठा आणि कार्यकर्ते या एकनिष्ठेच्या मुल्याचा ऱ्हास करीत असल्याने कार्यकर्त्यांना फक्त साहेब, भाऊसाहेब, दादासाहेब, तात्यासाहेब एवढेच म्हणण्याची पाळी अाली असून या लोकशाहीच्या देशात असलेल्या राजकीय पक्षातील राजकीय नेते हे आपल्या सोयीनुसार राजकारण करीत असल्याचे वास्तव्य नुकत्याच राज्यात सुरु असलेल्या
निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या घडामोडीतुन दिसून येत आहे. राज्यात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे नेते आणि राजकीय पक्ष हे आता सद्या स्थितीला महानगर पालिकेच्या निवडणुकीत विचारधारा आणि पक्षाची ध्येय धाेरणे याला तिलांजली देण्यासाठी तत्पर आहेत. आणि त्यासाठी ते काहीपण करायला तयार असल्याचे चित्र सद्या राज्यात पहावयास मिळत आहे.
ही बातमी वाचा – बहुमत नसलेल्या नगराध्यक्षाचा timer on…!
यावेळी सत्ता काबीज करण्याकरीता युतीच्या गोंडस नावाखाली तेथे कार्यरत असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सुध्दा विश्वासात न घेता दोन्ही राजकीय पक्षाचे जेष्ठ नते हे आपली भुमिका बैठकावर बैठका घेवून बजावित असल्याने आयुष्यभर ज्या पक्षाशी एकनिष्ठा जोपासली आणि पक्षाच्या ध्यये धोरणानुसार संबधित विरोधी पक्षावर वारंवार विरोधात भाषा वापरली आज सत्तेच्या हव्यासापायी विरोधात असलेल्या पक्षांची भुमिका आता युतीच्या गोंडस नावाखाली सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लाेकसभा आणि विधानसभा एकमेकाच्या विरोधात लढणारे काका पुतणे यावेळी महानगर पालिकेच्या निवडणुकीत पुणे महानगर पालिकेतील जागा लढविण्याकरीता एकत्र आल्याने पुण्यातील
शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षाने नाराजी व्यक्त केली. त्यावर केंद्रात खासदार असलेल्या सौ.सुप्रिया सुळे यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या नाराजीबद्दल विचारलेले प्रश्न आणि त्यावर सुप्रिया सुळे यांच्याकडून आलेल्या प्रश्नाचे उत्तर एकनिष्ठता जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छाताड्यात सुऱ्याने वार करणारे ठरत असले तरी त्या वक्तव्यातुन प्रोपेशनलता दिसून आली असल्याचे नाकाराता येत नाही. तर सत्तेसाठी आता राज्यात युती असलेले पक्ष आता एकमेकांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये एकमेकांच्या विरोधात आपणास पहावयास दिसून येणार आहेत.
तर अनेक वर्षापासूुन विरोधात असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याचे वास्तव्य आता दिसू लागले आहे. तरी कार्यकर्त्यांपेक्षाही सत्ता महत्वाची यालाच पक्ष प्राधान्य देत आहेत.त्यामुळे विरोधात कुठलाच पक्ष भुमिका बजावितांना दिसत नसल्याचे चित्र आहे. कारण अनेक पक्षांच्या नेत्यांनी भ्रष्ट्राचारात हात ओले केले असल्यामुळे सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात कुणाची बोलण्याची क्षमता जणु आता विरोधक भुमिकेच्या नेत्यामध्ये दिसत नाही हे विशेष
