मंत्र्यांच्या नेतृत्वात अविरोध झालेली नगर पालिका न्यायालयात टिकेल का?

मंत्र्याच्या मातोश्रीचे बिनविरोध नगराध्यक्ष पद न्यायालयाच्या कचाट्यात!

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

आता संपुर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना निवडणुक प्रक्रीया सुरु असून निवडणुकीचे चिन्ह वाटप होण्याअगोदर नगराध्यक्ष पदासोबत सर्वच नगरसेवक बिनविरोध निवडुन आल्याची घटना ही राज्यात प्रथमच असल्याचे आता बोलल्या जात आहे.

 

या नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरीता महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर भाजपाच्या वतीने आक्षेप नोंदवित मंत्री जयकुमार रावल यांनी नेतृत्व केल्याचा बोलबाला असला तरी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावसार यांनी न्यायालयात घेतलेल्या आक्षेपाविरुध्द अपील केले आहे. तरी मंत्री जयकुमार रावल यांचे नेतृत्व त्या अपीलच्या न्याय प्रक्रीयेत टिकाव धरु शकणार का असा सवाल आता चर्चेचा ठरु लागला आहे.

 

पुंगनूर जगातील सर्वात छोटी गाय

 

धुळे जिल्हयातील दोंडाईचा नगर परिषदमध्ये राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली या नगर पालिकेमध्ये 26नगरसेकव हे भाजपाचे बिनविरोध निवडून आले आहेत. संपुर्ण नगरसेवक व नगराध्यक्ष बिनविरोध ठरणारी दोंडाईच्‍ा ही राज्यातील नगर परिषद ठरल्याचा एक नाविण्यपुर्ण इतिहास घडविला असल्याचे राजकीय तज्ञांकडून बोलल्या जात आहे.
दोंडाईच्या नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणुक होती मात्र या ठिकाणावर झालेल्या निवडणुकीत विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या पक्षातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे 26 जागावर भाजापाचे उमेदवार बिनविरोध निवडुन आल्या असून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल या नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडुन आल्या आहेत.

 

 

दोंडाईचा वरवाडे नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरीता मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातुन उमेदवार शरयु भावसार यांनी उमेदवारी दाखल केली होती. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदावर भाजपाने आक्षेप घेतला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरयू भावसार यांचे वडील ॲड एकनाथ भावसार यांची घराची थकबाकी असल्याचे कारण पुढे करण्यात येवून सदर अर्ज बाद करण्यात आला त्यावर भावसार यांनी न्यायालयात धाव घेत अपील दाखल केल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

राज्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या मतदान प्रक्रीयेतच भाजपाचे तिन नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून आलेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध तर अनगर नगर पंचायत, दोंडाचा गनर पालिका भाजपाने बाजी मारली आहे. तरी या नगर पालिकेच्या विजयाची चर्चा आता संपुर्ण राज्यात रंगु लागली आहे हे विशष. तरी या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने केलेल्या अपिलावर न्याय काय निर्णय देते याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे एवढे मात्र निश्चीत!

 

Scroll to Top