नागपुर-पुणे वंदेभारत चे काय असणार तिकीट दर!

अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला सकाळीच नागपुर येथून हिरवी झेंडी देण्यात आली. नागपुर येथून निघाल्यानंतर आज दुपारच्या सुमारास शेगांव रेल्वे स्थानकावरही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने या गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
आज दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेली ही महाराष्‍ट्रात धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही बारावी वंदे भारत ट्रेन ठरली आहे. महाराष्ट्रातील नागपुर आणि पुणे ही विकसनशील शहरे जोडण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले ट्रेन सुरु करण्यात आली अाहे. अजनी-पुणे या दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन ही वर्धा, बडनेरा, अकोला,शेगांव, भुसावळ, जळगांव, मनमाड, कोपरगांव, अहिल्यानगर, आणि दौंड कॉर्ड लाईन या स्थानकावर थांबणार आहे.
महाराष्ट्रामध्ये अजनी नागपूर ही वंदे भारत एक्सप्रेस ही सर्वात लंाब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन असून ही ट्रेन तब्बल 881 किमी अंतर प्रवास करणार आहे. तसेच 73 किमी प्रतितास तिचा वेग राहणार असल्याची माहिती रेल्वेविभागाकडून मिळाली आहे.

शेगाव रेल्वेस्थानकावर वंदेभारतचे सहर्ष स्वागत

बहुप्रतिक्षीत असलेल्या वंदे भारत च्या स्वागताकरीता रेल्वे प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. नागपुर पुणे वंदेभारतच्या पहिल्या परित्रकामध्ये शेगांव ला थांबा नसतांनाही या जिल्हयाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सातत्यपुर्ण पाठपुरावा करीत शेगांव येथे येणाऱ्या भाविक तसेच शेगांवातील थांब्यामुळे परिसरातील प्रवाश्यांकरीता शेगांव थांब्याची मागणी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली त्यांच्या हस्ते वंदे भारत ला हिरवी झेंडी देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

आज शेगांव रेल्वे स्थानकावर वंदे भारत ला थांबा मिळाला असल्याने हा उत्सव साजरा करण्याकरीता केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव, जळगांव जामोद विधानसभेचे आमदार तथा माजी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे तसेच डीआरयुसीसी सदस्य राजेश अग्रवाल, झेडआरयुसीसी सदस्य रविकांत पाटील, रेल्वे व्यवस्थापक, पोलीस प्रशासन तसेच आरपीएफ विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह प्रवासी संघटना व भाजपा व महायुतीच्या पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती.

वेळ, तिकीट दर,स्लिपर कोच च्या अभावामुळे प्रवासी संघटनेकडून टीका

महाराष्ट्रातुन सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रैन पैकी नागपूर पुणे ही वंदे भारत ट्रेन ही लांब पल्लयाची असून तब्बल 881 किमी प्रवास या ट्रेन राहणार आहे. तरी या लांब पल्लयाकरीता स्लिपर कोच असाव्यात तसेच प्रवासाची वेळ सकाळी 9.50 रात्री 9.50 अशी राहणार असल्याने इतक्या दुरचा प्रवासाकरीता बसून प्रवास करणे कठीण होवू शकते असेही मत प्रवासी संघटनेच्या वतीने दर्शविण्यात आले आहे. तर या ट्रेन च्या तिकीट दराबाबत सुध्दा प्रवाशी सुध्दा नाराजी व्यक्त करीत आहेत.

असे असणार तिकीट दर

अजनी (नागपुर) ते पुणे चेअर कार (CC) (जेवणासह) 2140/-
अजनी (नागपुर) ते पुणे एक्सक्लुजीव्ह (EC) (व्हेज/ नॉनव्हेज जेवणासह) 3815/-
तर
शेगांव वरुन पुणे करीता चेअर कार (CC) (जेवणासह) 1795/-
शेगांव वरुन पुणे करीता एक्सक्लुजीव्ह (EC) (व्हेज/ नॉनव्हेज जेवणासह) 3150/- असे तिकीटदर आकारण्यात आल्याचे संकेत स्थळावरुन निर्दशनास आले आहे.

 

Leave a Comment