बेजबाबदार जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाई करा- हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्रात स्वतंत्रदिनाला विविध मागण्याकरीता अनेक आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.बुलढाणा जिल्हयातील जिगांव प्रकल्पातील पिडीतांनी प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करण्याकरीता दुपारच्या सुमारास नदीवर गावकऱ्यांना गर्दी केली या जिगांव प्रकल्पातील पुर्नवसन व अन्य मागण्यासाठी नदीत उडी घेवून बलिदान दिलेल्या विनोद पवार यांच्या कुटंबीयांना भेट दिली.
यावेळी बेजबाबदार जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही बातमी वाचा – बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट
सद्याचे सरकार हे सरळ रस्ता वाकडा करण्याचे काम करीत असल्याचे सांगत आपल्या हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार यांचा राजकीय बळी गेल्याचे वक्तव्य केले. या भेटीदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जिल्हाधिकारी शासनाचे कर्मचारी असतांना सुध्दा जिल्हाधिकारी यंानी पवार कुटुंबीयांची भेट घेतली नाही, ते वेडंवाकड बोलतात,एवढेच नाही तर या मृतकाच्या घरी कुणीच मंत्री देखील आले नाहीत.
तरी जिल्हाधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रेटून धरली आहे.

Comments are closed.