महाविद्यालयीन प्रवेशकरीता शुल्क जास्त आकारल्यास काय होणार कारवाई!

शुल्क नियामक प्राधिकरणाचा इशारा

नुकतेच आता नव्याने वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या खाजगी विना अनुदानित महाविद्यालयांनी एका विद्यार्थ्यांकडून एका शैक्षणिक वर्षाच्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क वसुल करु नये अशा प्रकारे अतिरीक्त शुल्क घेतल्यास ती रक्कम कॅपिटेशन फी मानली जाईल आणि संबधित संस्थेविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा शुल्क नियामक प्राधिकरण (एफआरए) ने दिला आहे.

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनीयमन ) अधिनियम नुसार प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून किती शुल्क घ्यावे, किती वर्षाचे घ्यावे याबाबत सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली तसेच प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या विनाअनुदानित खासगी व्यवसायिक शैक्षणिक संस्थानी शैक्षणिक वर्ष 2025-26 या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून घ्यावयाचे शुल्क नि निश्चीत केलेले असते.

मात्र त्यानंतर अनेक वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधी व कृषी अभ्यासक्रमाच्य खासगी विना अनुदानित महाविद्यालयाकडून एका वर्षापेक्षा अधिक शुल्क वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे येेत असतात. त्यामुळे अशा महाविद्यालयावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त एकाच वर्षाचे शुल्क भरावे.

Leave a Comment