प्रभाग क्र. 4 च्या वचिंत च्या उमेदवार सौ. ओवे यांच्या प्रचाराला प्रभागवासीयांचा उदंड प्रतिसाद

नव्या तरुण नेतृत्वांना मिळत आहे भरघोस पाठिंबा

शेगांव- शेगांव नगर पालिका प्रभाग क्र. 4 च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. ओवे यांची प्रचार यंत्रणा ही पुन्हा जोशाने तत्पर झाली असून विविध समाज घटकांशी असलेली आपलेपणाची बांधिलकी यावेळी पाठिंबा दर्शविणारी ठरली आहे. चि. पियुष ओवे याची सामाजिक बांधिलकी जोपासत असतांना केलेली आजवरची भुमिका व या प्रभागातील विविध समाज घटकातील वयोवृध्दांचे आशिर्वाद यावेळी विजयाची समिकरणे निर्माण करीत असल्याचे वातावरण प्रभागातील प्रचार यंत्रणेतुन पहावयास मिळत आहे.
राखीव गटातुन यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या सौ. सिमा ओवे यांना यावेळी प्रभागवासियांना आपल्या हक्काचा माणुस म्हणून या प्रभागवासीयांचा पाठिंबा मिळत आहे. सौ. ओवे व युवकांची फळी ही आजच्या अत्याधुनिक युगातही तांत्रिकतेचा वापर करीत नव्या खेळीने  डिजीटल प्रचारातही अग्रेसर असल्यामुळे अनेकांच्या मोबाईलवर परिर्वतन घडविणारे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे चित्र प्रभागातील युवा पिढींकडून समोर येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचा या प्रभागात चांगलाच प्रभाव असल्याने आंबेडकरवादी चळवळीसोबत मुस्लीम बहुल आणि इतर समाज घटकासोबत  दैनंदिन असलेले आपले पणाचे संबध यावेळी या प्रभागात सत्तापरीवर्तनाकरीता सक्षम दिशेने वाटचाल करीत असल्याचे वातावरण आता प्रभागवासीयांच्या चर्चेचा सुर असल्याचे चित्र आता प्रभागातील प्रचाराच्या धामधुमी मोठ्या जाेमात पहावयास मिळत आहे. तरी यावेळी या वेळी सत्ता परिर्वतन निश्चीत असा आशावाद या प्रभागवासीयांनी सौ.सिमा ओवे यांना दिला असून नवा लोकप्रतिनिधी म्हणून शुभेच्छा देत पाठिंबा दर्शविला आहे.
Scroll to Top