s

आज मतदान- पण गुलाल उधळणार 21 डिसेंबरलाच

आज मतदान मात्र मतमोजणी होणार 21 डिसेंबरला

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असलेल्या आणि न्यायालयीन लढ्यात अडकलेल्या निवडणुका, राजकीय नेतृत्वांकडून होणारी टाळटाळ आणि न्याय प्रक्रीयेत अडकलेली यंत्रणा या सर्व बाबींना पुर्ण विराम देत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरु झाल्या असल्या तरी 9 वर्षानंतर नगर परिषद निवडणुका साठी आज महाराष्ट्रात मतदान पार पडण्याची प्रक्रीया सुरु असतांना यातही काही ठिकाणी आरक्षण आणि न्यायालयीन पेचामुळे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलून 20 डिसेंबरला घेण्याचा निर्णय निवडणुक आयोगाला घ्यावा लागला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

आज न्यायालनीत पेचात नसलेल्या ठिकाणी मतदान प्रक्रीया होत अाहे. यामध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने आगळीवेगळी रंगत निर्माण झाल्याचे चित्र असतांना दुसरीकडे काही निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आयेगाच्या निर्णयाला न्यायालयीन आव्हान देण्यात आले असून त्यावर आज सुनावणी होणार असल्याचे कळते.

 

अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रीया जरी आज होत असली तरी उद्या लागणार निकाल हा 21 डिसेंबरला प्रलंबित मतदान प्रक्रीयेसोबत घोषित करण्यात येणार असल्याचे संकेत निवडणुक आयोगाकडून समोर आले आहेत.

ही बातमी वाचा –होय नगराध्यक्ष भाजपाचा असावा- आ.डॉ.संजय कुटे

आजच्या निवडणुक प्रक्रीयेतील पारदर्शकता आणि न्यायासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचे वकील यांनी केलेल्या युक्तीवादानुसार काही ठिकाणचे निकाल आधी जाहीर केले तर त्याचा परिणाम उर्वरित मतदान प्रक्रीयेवर होवू शकतो. त्यावर न्यायालयाच्या वतीने हा मुद्दा मान्य करीत म्हटले की, सर्व निवडणुका संपल्याशिवाय कोणत्याही ठिकाणी निकाल जाहीर करणे हे निवडणुकीला न्याय देणारे ठरणार नाही, त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय देत निकाल पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहे.

 

Scroll to Top