Voterlist

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

हरकतदारांच्या संख्येत बहुसंख्येने वाढ

शेगांव- महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुक आयोागच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थोच्या निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात केली असून प्रारुप प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर प्रारुप मतदार याद्या सुध्दा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल चार वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निवडणुका आता सुरु होणार यामुळे इच्छुकांना सद्या आरक्षणानुसार आपल्या प्रभागात नगरसेवक पदाचे डाेहाळे लागले आहेत. तर अनेक प्रभागामध्ये अपेक्षित आरक्षण आले नसल्याने अनेकांची नाराजी झाली असली तरी आता मतदार प्रारुप याद्या प्रकाशीत झाल्यानंतर मतदार याद्यामधील तसेच प्रभाग रचनेनुसार मतदारांच्या नोंदणीबाबत असलेली तफावत व दुरस्तीबाबत तक्रारीच्या अनुषंगाने दि. 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ती प्रभागातील हरकती दाखल कराव्यात असे आवाहन मुख्याधिकारी शेगांव नगर परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

काँग्रेस पक्षाच्या वतीने नोंदविल्या हरकती
शेगांव नगर परिषदेची प्रारुप मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर अनेक त्रुटी विविध प्रभागांच्या प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून आल्या असल्याने काँग्रेस च्या जेष्ठ नेते तथा काँग्रेस शहराध्यक्ष यांच्या वतीने नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. त्यावर हरकतीनुसार प्रभागातील मतदारांच्या नाव दुरुस्ती, गाहाळ बाबत निवडणुक विभागाचे अधिकारी व कर्मचारी जोमाने काम करीत असल्याचे चित्र शेगांवात पहावयास मिळत आहे.

ही बातमी वाचा जि प व पंचायत समितीवर स्विकृत सदस्य !-

तरी या हरकतीच्या सुनावणींनंतर दि. 31 ऑक्टोंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय याद्या प्रकाशित करण्यात येणार आहेत त्यानंतर मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिध्दी सात नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम प्रभाग रचला अधिसूचना दि. 29 सप्‍टेंबर रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादी विभाजनानुसार तसेच जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाची यादी वापरण्याचे आदेश आहेत अस्तित्वात असलेली मतदारयादी शेगांव नगर पालिकेच्या 15 प्रभाग विभागुन प्रारुप यादी दि. 8 ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तरी आता या प्रारुप याद्यामध्ये विशेषतः आपण ज्या प्रभागात राहता त्य्ा प्रभागातील मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक आहे.

निवडणुक आयोगाच्या पारदर्शकतेला काळीमा फासल्या जाणार नाही अशी प्रक्रीया अधिकाऱ्यांनी राबवावी- निलेश घोंगे
शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचना आणि त्यावर हरकतीबाबत जिल्हाधिकारी यांच्या मौखिक निर्देशानुसार कुठलीच अंमलबाजवणी न करता अंतिम यादी प्रकाशित करण्यात आल्यामुळे या गैरप्रकारची तक्रार निवडणुक आयोगाकडून घेण्यात आली असून त्याबाबत न.प.मुख्याधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांना निर्देश देण्याचे आदेशच विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहेत. तर अाता या पुढील प्रक्रीया ही पारदर्शकतेमध्ये होण्यासाठी प्रशसनातील अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वपुर्ण सहकार्य द्यावे असे मत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घोंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलतांना व्यक्त केले.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. हरकती व सुना दाखल करतांना संबधितांना त्याबाबतचे पुरावे जोडणे बंधनकारक राहणार आहे. शेगांव नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासना सज्ज आहे. तरी आता प्रारुप मतदार याद्यावर हरकती नोंदविण्यासाठी दि. 17 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेगांव शहरामध्ये विविध पक्षांच्या वतीने तसेच वैयक्तिक पातळी निवडणुक लढविण्यास ईच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या वतीने बहुसंख्य तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर अनेक प्रभागातील नागरिकांची नावे ही दुसऱ्या प्रभागात नोंदणी झाल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांडून नगर परिषद कार्यालयात सुरु असलेल्या निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्यात येत आहेत.

Scroll to Top