Jayant Patil

पडळकरांच्या आक्रमक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिली पहिली प्रतिक्रीया

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  आमदार गोपीचंद पडळकर  हे नेहमीच आक्रमक भुमिका बजावित असतात. परंतु नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कतृत्वशिल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री असलेले जयंत पाटील यांची प्रतिमा ही आजवर अभ्यासपुर्ण राहिली असून कर्तव्यशिलता व संभाषण व इतर कामाबाबत त्यांचा स्पष्टोक्तीपणा हा महाराष्ट्राचा राजकारणात नेहमीच आदरणीय राहिलेला आहे. त्यांची कर्तव्यदक्षता आणि कार्यपध्दती ही इतर राजकीय नेत्यांना सुध्दा प्रेरणदायी असल्याचे दाखले हे अनेक राजकीय पुढाऱ्यांकडून देण्यात येत असले तरी भाजपाचे आमदार  गोपीचंद पडळकर यांनी  सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

त्यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?” अशा अर्वाच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.

ही बातमी वाचा –शिंदे गट जिल्हाप्रमुख यांच्या राजीनाम्यासाठी 40 पदाधिकाऱ्यांचे राजिनामे!

 

गोपीचंद पडळकरांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

 

‘अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे ती कार्यक्रम करायची. तुझ्यासारख्याची औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही,’ असं वादग्रस्त विधान पडळकरांनी आपल्या भाषणादरम्यान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  वतीने या वक्तव्याबाबत पहिली प्रतिक्रीया दिली आहे. आजवर राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे, गडकरी, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सुध्दा टीका करण्यात आल्या असल्या तरी त्या इतक्या खालच्या स्तरावर नसल्याचे शरद पवार यांनी प्रतिक्रयेदरम्यान सांगितले.

https://x.com/ShubhamJatalNcp/status/1968666029329928704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1968666029329928704%7Ctwgr%5Efff97eaa7c4edfbd9ccfb8c262d85b1e86861ac8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fmaharashtra%2Fcm-devendra-fadnavis-first-comment-on-mla-gopichand-padalkar-controversial-statement-about-jayant-patil%2F940482

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा केल्या सुचना

आमदार गोपीचंद पडळकर यांनी  राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या विरोधात वडीलांवरुन केलेल्या वक्तवाची चर्चा ही  सोशल मिडीयातुन होत आहे. असतांना अशा वक्तव्याबाबत आमदार गोपीचंद यांनी कुणाच्या वडीलाबद्दल अपशब्द काढणे हे चुकीचे आहेे. तरी यापुढे भविष्यात असे होता कामा नये याबाबत सुचित केल्याचे देेवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाच्या शेवटी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपले मत स्पष्ट केले. तर गोपीचंद पडळकर हे युवा नेते असून ते आक्रमक असतात. त्यांच्या जोशात जे वक्तव्य करतात त्यांचा काही अर्थ निघेल याचे सुध्दा त्यांना भान नसल्याचे त्यांनी सांगितले

Comments are closed.

Scroll to Top