उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे वंदे भारत ट्रेन ला मिळाला शेगांवात थांबा

शेगांव- श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या संतनगरीमध्ये असलेल्या शेगांव रेल्वे स्थानकास अ दर्जा आहे. कारण श्रींच्या दर्शनाकरीता तसेच पर्यटनाकरीता शेगांव ला भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुर पुणे वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची तयारी दर्शविली असली तरी शेगांवला थांबा नसल्याने भाविकांसह शेगांवकरांकडून सुध्दा नाराजीचा सुर उमटत होता.

याची माहिती मिळताच या जिल्हयाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे शेगांव संस्थान आणि भाविकांची असलेली वर्दळ याचे महत्व पटवून देताच शेगांव रेेल्वे स्थानकामध्ये वंदे भारत चा थांबा मंजुर करण्यात आला आहे. शेगांवातील भाविकांच्या सोयीसाठी तसेच शेगांव रेल्वे स्थानकातुन आकोट, तेल्हारा, चिखली, खामगांव, बुलढाणा आदी भागातील प्रवाश्यांना सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

शेगांव- पुणे हा प्रवास या गाडीच्या माध्यमातुन अवघ्या 6 तासात करता येणार असल्यामुळे वेळेच बचत आणि आमरदायक प्रवास अशी संधी या वंदे भारत ट्रेन च्या माध्यमातुन अनुभवता येणार असल्याचा आनंद आता भाविकांमध्ये पहावयास मिळत आहे. कारण मुंबई आणि पुण्यातील भाविकांनी कमी कालावधीमध्ये शेगांव येथील दर्शन घेणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनची घोषणा होताच अनेकांंना उत्साह होता. परंतु अजनी- पुणे वंदे भारत ट्रेन ची घोषणा झाली त्यावेळेस शेगांवला थांबा ला नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सुर होता. परंतु याबाबत बुलढाणा जिल्हयाचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव याची भेट घेवून शेगांव रेल्वे स्थानकाचे महत्व पटवून देताच रेल्वे विभागाने वंदे भारत ट्रेन ला शेगांव थंाबा दिला असल्यामुळे आता सर्वांनाच 10 ऑगस्ट रोजीची प्रतिक्षा लागली आहे.

पहिल्या परिपत्रकामध्ये या ट्रेनला अजनी नागपुर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ , जळगांव, मनमाड, कोपरगांव, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुणे असा प्रवास मंजुर होता. तरी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे शेगांव चा थंाबा मिळाला आहे हे विशेष.

10 ऑगस्टपासून सुरु होणारी ही ट्रेन आठवड्यातुन 6 दिवस चालणार आहे. नागपुर येथुन सकाळी 9.50 वाजता निघणार असून वर्धा, बडनेरा, अकोला मार्गेे 1.20 च्या सुमारास शेगांवात दाखल हेाईल. त्यानंतर पुढे मार्गस्थ होईल तर पुण्यावरुन येणारी ट्रेन दुपारी 2.45 वाजता शेगांव रेल्वे स्थानकात दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडुन देण्यात आली आहे. तर नागपुर – पुणे 884 कि.मी. चे अंतर 10 तासात कापणार आहे.

Leave a Comment