सातपुडा परिसरात असलेल्या श्री हनुमान सागर वान धरणाच्या पातळीत 62.32 टक्के पाणी साठा झाला असून बुलढाणा जिल्हयासह इतर जिल्हयातही पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर पातळीची माहिती ही दोन ते तीन दिवस अगोदरची असून लवकरच वान धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये पुर्णतः वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ही बातमी वाचा –जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना कोणते सोयरे सुतक!- हर्षवर्धन सपकाळ
बुलढाणा जिल्हयातील बहुतांश तालुक्यांना विशेषतः शेगांव शहराला पाणी पुरवठा सुध्दा याच धरणातून होत असल्यामुळे शेगांवकरांचा बहुप्रतिक्षीत पाणी प्रश्न मिटला अाहे. तर जळगांव जामोद विधानसभा क्षेत्रामध्ये ही खारपाण पट्टयातील गावांकरीता या धरणाचा पाणी पुरवठा होत असल्याने नक्कीच फायदा होत अाहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यानच या धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची वार्ता ही नक्कीच आनंद वार्ता आहे.
तरी आता हवामान विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार जिल्हयासह राज्यात मुसळधार पावसाचे संकेत मिळाले असल्याने लवकरच वान धरणाची पातळी पुर्णतः भरेल अशी माहिती मिळाली आहे.

Comments are closed.