crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव!

रेल्वेच्या धडकेने एक शेतात फेकला, तर दुसरा अडकला रेल्वेच्या हुकमध्ये, 500 मीटर सांडला रक्ताचा सडा

आजच्या युगामध्ये सोशल मिडीयामध्ये तत्पर असणाऱ्या बालकांनी  ट्रेनच्या ट्रॅक वर रिल्स बनविण्याच्या नादामध्ये बेभान  असल्यामुळे जिवाला मुकावे लागले  असल्याचे समजते. यामुळे जळगांव शहरासोबतच राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मोबाईलवर रिल बनविण्याच्या नादामध्ये दोन शालेय शिक्षण घेणाऱ्या मित्रांचा जिव गेला आहे. जळगांव जिल्हयातील धरणगांव गांव तालुक्यातील  पाळधी- चांदसर रेल्वे गेट जवळ दि. 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास  ही दुर्देवी घटना घडली आहे.
हा अपघात इतका भिषण होता की, रेल्वेच्या धडकने एक शेतात फेकला गेला तर दुसरा रेल्वेच्या हुकामध्ये अडकला
रविवार रोजी सकाळी  चांदसर गेटाजवळ रेल्वे अोलांतडता हा अपघात अहमदाबाद हावडा एक्सप्रेस च्या धडकेत प्रशांत खैरनार व हर्षवर्धन नन्नवरे  असे त्या अपघात झालेल्या18 वर्षीय मुलांची नावे आहेत.
एक्सप्रेस च्या लोकोपायलट यांनी पाईंटसमन  यांना दिलेल्या माहितीनुसार पाईंटसमन अरुण चौधरी यांच्या वतीने या घटनेची पाळधी पोलीसात फिर्याद देण्यात आली. पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार धरणगांवकडून जळगांव कडे येणाऱ्या अहमदाबाद हावडा एक्सप्रेस च्या चालकाने दिलेल्या हॉर्नच्या आवाजाने ते घाबरले आणि गांगरले ते रुळावरुन बाजूला होण्याआधीच गाडीने  त्यांना धडक दिली.
भिषण अपघाताची वास्तविकता
हा अपघात इतका भिषण होता की, या दोघापैकी एक तरुण  हा रेल्वेने दिलेल्या धडकेत शेजारील शेतात फेकला गेला तर दुसऱ्या रेल्वेच्या हुकात अडकला  या घटनेत 500 मीटर रक्ताचा सडाच पडलेला होता. या घटनेनंतर पाळधी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली  होती.
तरी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ही मुले रिल्स बनविण्याच्या नादात असल्याची माहिती मिळाली आहे.
Scroll to Top