राज्यात निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांचा बुलढाणा जिल्हा आयोजित करण्यात आला असला तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातुन शेगांव शहराकरीता नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरीता नवी फळी रिंगणात उतरविली आहे.
पक्षाची मुळे रोवण्याच्या दृष्टीने अजित पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना यावेळी नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांची यावेळी असलेली भुमिका राजकीय वातावरण तापवुन टाकणारी असल्याचं चित्र शेगांव शहरात पहावयास मिळणार आहे.
ही बातमी वाचा – ठेकेदारीचा वारसा जपणाऱ्या उमेदवारांंना कलाटणी देण्याची जनतेची भुमिका!
निवडणुक आयोगाच्या प्रचाराच्या सुरु होणाऱ्या धर्तीवर शेगांव शहरातील अग्रसेन चौकात कार्यालयाच्या उदघाटनाकरीता 10 मिनीटाच्या कालावधी त्यांची भेट ही शेगांव शहराचं राजकारण पलटवुन टाकणारी आहे. असे आता राजकीय तंज्ञांकडून चर्चिल्या जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाची माळ नवख्या तरुण नेतृत्वास दिली असून नगरसेवक पदाच्या उमेदवारंाकरीता अजितदादांच आगमन म्हणजे जणु नवसंजिवनी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. निर्भीड अजितदादा या निवडणुकीच्या अनुषंगाने शेगांव शहराकरीता कोणते अभिवचन देवून काय रणनिती मांडतात हे येणारा काळ दाखवुन देईल. तुर्तास एवढेच…
