देशाच्या राजकारणात मला ज्ञात असल्यापासून संघर्षातुन सत्तेकडे धावपळ करीत असतांना राजकीय प्रवासात संघर्ष आणि संघर्ष पेलणाऱ्या जनता पक्ष, आणि आजचा भारतीय जनता पार्टी पक्ष यातील संघर्षाची भुमिका ही तत्पर असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. अपयश अनेकदा आली असली तरी एक विचारधारा आणि एकनिष्ठता जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपातील नेतृत्वाचा आदर्श आता स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करणाऱ्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे.
देश स्वातंत्र्यपासून कार्यरत असलेली काँग्रेस पार्टी आणि त्या पार्टीच्या बळावर अनेक पदे अनेक संस्था आणि प्रतिष्ठेसह सन्मानजनक असे बरेच काही दिल्यानंतरही मागील 11 ते 12 वर्षाप्ाासून केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्याने कासाविस झालेल्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत स्वतःच्या सोयीच्या राजकारणाला पसंती दिल्याचे पहावयास मिळत आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि त्यातुन मिळाला आजवरचा मानसन्मान हा सुध्दा येणाऱ्या पिढीच्या अनुषंगाने विचारधारा बदलवित घेत असलेला प्रवेश आज रोजी कितपत योग्य आहे याची त्याच राजकारण्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज समोर येवून ठेपली आहे.
काँग्रेस पक्ष हा वेगळ्या विचारधारेचा असला तरी त्या पक्षाच्या माध्यमातुन अनेकांना मंत्रीपदे, आमदार, खासदारकी, विविध संस्था आणि प्रतिष्ठा दिल्यानंतर आज आपल्या चुकीच्या मार्गापासून वाचण्याकरीता यांना सत्तेची फळ चाखायची आहे म्हणून भितीपोटी आणि स्वार्थापायी हे पक्ष बदल करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. महाराष्ट्रात शिवसेनेला प्रारंभीची लागलेली घरघर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला केलेला जय महाराष्ट्र हा नेमका कितपत समाजहिताचा होता वा स्वहिताचा होता हे सांगण्याची गरज नाही.
तर वयाच्या साठीत शरद पवार यांनी स्वाभिमान संभाळण्याकरीता स्थापन केेलेला राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी असलेल्या तत्परतेला अजित पवारांच्या सत्तेच्या भुमिकेमुळे निष्टा संपुष्टात आली असल्याचे दिसून येत असले तरी त्याबाबत फारेसे काही स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे.
ही बातमी वाचा – अपंग व निराधारांना प्रतिक्षा वाढीव मानधनाची!
भारतीय जनता पार्टीचा संघर्ष प्रवास हा नक्कीच एकनिष्ठेचा असल्याचे वास्तव्य राजकीय प्रवासात अनुभवयास मिळाले असले तरी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आणि एकनिष्ठतेला जपणारी नेते मंडळी घरच्या भाकरी खावून प्रचाराची भुमिका तत्परतेने बजावत असल्याचे चित्र राज्यात आणि केंद्रात पक्ष उभारणी पासून ते सत्ताकारण करण्यापर्यंत मजल मारतांना ही एकनिष्ठतेला बगल देतांना दिसून येत नाही. निवडणुक असो वा प्रचाराचा भाग असो. यांच्या तालमीत तयार झालेल्या प्रत्येक कार्यकर्ता हा एकनिष्ठतेचा बाणा जोपासत असल्याचे दिसून येते. तर गुजराथमध्ये सुध्दा पक्ष वाढीसाठी मोदी यांची भुमिका आणि आता केंद्रातही पक्षाचा झेंडा तिलोकी फडकविण्यासाठी असलेली धडपड ही खरोखरच इतर राजकीय पक्षातील नेत्यांना आदर्श देणारी आहे. नितीन गडकरी यांचा राज्यात आणि केंद्रात आजचा सन्मान हा जरी दमदार ठरत असला तरी पक्षाच्या उभारणीच्या काळात आणि सत्ता केंद्र काबीज करण्याकरीता पक्षाची ध्येय धोरणे रुजविण्याकरीता असलेली भुमिका ही एकनिष्टतेची राहिली आहे. त्यांच्या पडतीच्या काळात अनेकदा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वांकडून अनेक ऑफर अाल्या असल्या तरी त्या कुणापुढे न झुकता त्यांची असलेली भुमिका ही एकनिष्ठतेची असल्याचा आदर्श हा इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे.
राज्यातील इतर पक्षातील नेत्यांची असलेली सत्तेची भुक पाहता भाजपात इनकमिंग वाढल्याचे चित्र राज्यात वा केंद्रात जरी वाढीस लागले असले तरी पडतीच्या काळातही सत्ताकारणाचा विश्वास ठाम ठेवणाऱ्या मोदी-फडणवीसाचा आदर्श मानावा लागले. अशी वास्तविकता आजच्या होत असलेल्या घडामोडीतुन पहावयास मिळत आहे. पक्ष बदल हा आपल्या स्वतःच्या सोयीच्या राजकारणाकरीता केलेल्या अनेक नेत्यांची नावे ही प्रखरतेने अनेकांनी अनुभवली असली तरी नुकत्याच काँग्रेसचे नेते असलेल्या राजीव सावंत यांच्या पत्नी नुकत्याच भाजपवासी झाल्याच्या बातम्या या प्रकाशित झाल्यामुळे स्वतःच्या सोयीच्या व येणाऱ्या पिढीच्या सुरक्षितेसाठी पक्ष बदल हा चर्चेचा ठरु लागला आहे.
सन 2014 मध्ये जर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मंत्रीपदाचा पदभार मिळाला नसता तरी फडणवीस यांनी सुध्दा पक्ष बदल केला असता परंतु या अगोदरही आपला बाणा आणि आपल्या आर्दशासाठी एकनिष्ठता जोपासत राजकारणात एकसंघ राहत इतरांनाही एकसंघ कसे ठेवता येईल याची कर्तव्यतत्पर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपध्दतीतुन अनुभवयास येत आहे. तर मागील काही वर्षातील राजकीय पक्षातील भुकंप, जय महाराष्ट्र आणि सोडचिठ्ठया या एकनिष्टपणाला बगल देणाऱ्या आणि स्वतःच्या सोयीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांचा असल्याने यांनी तरी आता पक्षाच्या एकनिष्ठतेला जपणे सोडू नये. ही वास्तविकता मांडण्याची गरज वाटली करीता सदर लेख..
