सणासुदीच्या काळात असलेल्या सुट्टया पाहता बाहेरगावी मालकिन आणि परिवार जाणार यांची पाळत ठेवून कायदा व सुव्यवस्थेला बगल देत चोरट्यांनी हात साफ करीत शेगांव शहरात असलेल्या उच्चभ्रु वसाहतीत धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.
दिवाळीच्या सुट्टीत घराला कुलुप लावून गेलेल्या घरात घुसुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. 25 ऑक्टोबर रोजी राजराजेश्र्वर कॉलनीत रात्रीच्या सुमारास घडली.
या घटनेप्रकरणी उपजिल्हा रुग्णालय,शेगांव येथे कार्यरत असलेल्या सोनाली ढगे(डांगरे) रा. राजराजेश्वर कॉलनी यांनी शेगांव शहर पोस्टेला दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दिवाळी सणानिमित्त आपल्या सासरी चोहट्टा बाजार ता.आकोट येथे गेल्या होत्या तेव्हा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलुप तोडून घरात घुसुन अलमारीमध्ये ठेवलेले अंदाजीत किंमत 60 हजार रुपयाचे वेगवेगळे बनावटीचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादीवरुन कळाले.
ही बातमी वाचा –लाचखोरांची शेकडो प्रकरणे कारवाईच्या प्रतिक्षेत; गृह खात्याने धुळ झटकण्याची गरज!
त्याच कॉलनीत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मनिषा अमितकुमार चंदनगोळे यांच्या घरात घुसुन चोरट्यानी त्यांच्या घरातील दागिन्यावर डल्ला मारला तेथुन अंदाजे 25 हजार किंमतीचे सोने-चांदी चोरीला गेले तर त्यांच्या शेजारी असलेल्या आशिष मनोहर जुमडे यांच्या घरातुन सोन्याचे कानातील रिंग चोरीला गेले असून ते दोन हजार रुपये किंमतीचे होते.
अशा घटनेमुळे या परिसरात राहत असलेल्या नागरिकांच्या वसाहतीत भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याची प्रतिक्रीया नागरिकांकडुन उमटत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम पोलीसांचे वतीने सुरु आहे.
