शेगांव- मागील 9 वर्षापासून शेगांव नगर पालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शेगांव नगर परिषदेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची शेगांव नगर परिषदेची जबाबदारी संभाळली आहे. शेगाव नगर परिषदेतील निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर अनेक दिवसापासून प्रलंबित असतांना या प्रकरणाची सुनावणी होवून निवडणुकीची तयार करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळताच या निवडणुकीची चर्चा आता रंगु लागली आहे.
निवडणुक आयोगाच्या निकषानुसार प्रभागनिहाय रचना आता प्रसिध्द करण्यात आली असल्याने मागील अडीच वर्षापेक्षा जास्त काळापासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ईच्छुकांना सुध्दा जाग आली आहे. त्या अनुषंगाने आता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होणार आणि लवकरच निवडणुक कार्यक्रम लागणार असा आशावाद इच्छुकांमध्ये वाढीस लागला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनुसार टाकण्यात आलेल्या या प्रभागांचे विभााजन हे पुर्ववत होते की, या विभाजानाचा आता आपल्याला काही फायदा होणार की नाही, यावर आता चर्चा रंगु लागल्या आहेत.
ही बातमी वाचा –अरुण टायपिंगची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
हरकती व सुचनावर होणाऱ्या कार्यवाहीची प्रतिक्षा!
शेगंाव शहरातील भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्दी करण्यात आली असली तरी या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती नेांदविण्याकरीता निवडणुक आयेागकडून दि. 31 अॉगस्ट 2025 ही तारीख निश्चीत केली आहे. त्यामुळे असलेल्या प्रभागामध्ये इच्छुकांकडून प्रभागाचा अभ्यास करुन त्यावर हरकती नोंदविण्याचे काम 31 ऑगस्ट पर्यंत झाल्यावर त्यावर निवडणुक आयोग काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी प्रभागाच्या रचनेचा अभ्यास, मतदारांचे विभाजन हा कळीचा मुद्दा असून काहींना सोयीचे तर काहींना गैरसोयीचे असल्याचे वास्तव्य आता चर्चिल्या जावू लागले असून आरक्षण निहाय होणाऱ्या या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक प्रतिक्षा करीत आहेत हे विशेष
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रभाग प्रारुप याद्या प्रकाशित केल्या असल्या तरी कारणप्रारुप प्रभागाच्या भौगोलिक सिमांबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. तर यासाठी दि. 31 ऑगस्ट 2025 पर्यं प्रारंप प्रभाग रचेनेवर आक्षेप नोंदविता येणार आहेत. आक्षेप व सूचना न आल्यास निवडणुक विभागाने प्रसिध्द केलेली प्रारुप प्रभाग रचना कायम ठेवण्यात येणार आहे. शेगांव नगर पालिकेचेे आता एकुण 15 प्रभाग झाले असून यामधुन 30 नगरसेवकांना निवडून जाता येणार आहे.
त्यामुळे सदर पालिकेतील नगरसेवकांची संख्या ही 30 राहणार आहे. मागील तिन वर्षापासून रखडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला असल्याने निवडणुक आयोगाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासोबत आता नगर पालिका प्रभाग रचना निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी शेगांव शहरातील प्रारुप प्रभाागच्या भौगोलिक सिमा प्रसीध्द करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला असला तरी प्रभागाच्या भौगोलिक सिमांची माहिती असलेली अधिसूचना 18ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे.
आणि त्यावर हरकती व सूचना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत नगर परिषद, मुख्याधिकारी यांच्याकडे करता येणार आहे या आक्षेपाचा कालावधी संपलयानंतर प्रारुप प्रभाग रचना कायम करण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या प्रभागाच्या रचनेबाबत राजकीय पुढाऱ्यांकडून री ओढण्याचे काम तर होणारच आहे. तरी मागील तिन वर्षापासून निवडणुकीची प्रतिक्षा लागलेले आजी माजी नगरसेवक आता कामाला लागल्याचे चित्रअसून या रचनेबाबत कोणकोणते आक्षेप घेण्यात येतात. आणि काय हरकती व सुचना आदी बाबत अनेकांचे तर्कवितर्क असले तरी असलेल्या राखीव मतदारांची संख्या कमी जास्त झाल्यास त्या प्रभागातील होणारे बदल याबाबत 31 ऑगस्ट च्या हरकती नंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे बहुप्रतिक्षिीत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या याद्या प्रसीध्द झाल्याने कधी काळी सुप्त असलेले राजकीय पुढारी सुध्दा हालचाली करण्यास तत्पर असल्याचे वातावरण शेगांव शहरात पहावयास मिळत आहे हे विशेष.

Comments are closed.