समृध्दी महामार्गावर वाहने पंचर करुन चोरीच्या उद्देशाने खिळे लावण्यात आल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
शेगंाव- कालपासून सोशल मिडीयामध्ये समृृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत असला तरी या महामार्गावर चोरीच्या उद्देशाने सदर खिळे लावण्यात आलेले नसल्याची माहिती संबधितांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की, दि.09/09/2025 रोजी 11.00 वाजे पासून समृद्धी महामार्गावर, माळीवाडा इंटरचेंज छ. संभाजीनगर येथे (पोलीस स्टेशन दौलताबाद हद्दीतील) मेगा इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनी कडे समृद्धी महामार्गाच्या देखभालीचे काम असून पूर्ण बॅरिकेटिंग करून रस्त्याच्या भेगांसाठी इपॉक्सी ग्राउटिंग हा काँक्रीट रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भेगेमध्ये इंजेक्शनद्वारे मिश्रण भेगेमध्ये टाकण्यासाठी नोझल लावण्यात आलेले होते.
ही बातमी वाचा –Breaking News-आता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य
सदर महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी बॅरिकेट उडवून काम सुरू असलेल्या रोड वरून गाडी घातल्या मुळे प्रवाशांच्या गाड्या पंक्चर झाल्या होत्या. दिनांक 09.09.2025 रोजी 20.00 वाजता दरम्यान गाडी पंक्चर झालेल्या प्रवाशांनी त्या वेळेत व्हिडीओ काढून चुकीचा मेसेज सोशल मीडियावरती प्रसारित केला. सदर ठिकाणी चोरीचा कुठलाही प्रकार नाही तसेच कोणहिती हानी झालेली नाही.
MSRDC च्या वतीने देखभालीचे काम सुरू आहे. या बाबत महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. सदर महामार्ग देखभालीचे काम पूर्ण झाल्याने सदर खिळे आज दि 10.9.2025 रोजी काढण्यात आलेले असून वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती संबधित विभागाकडुन देण्यात आली आहे. तरी साेशल मिडीयातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून समोर गैरसमज दुर व्हावेत करीता जनहितार्थ प्रकाशित.
