https://mahasec.maharashtra.gov.in/

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल…

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

राज्यामध्ये अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासुन प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुक आयोगाने कामाला सुरुवात केली असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आजस्थिती होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळाले आहे.

 

 

राज्य निवडणुक आयोग व नगर विकास विभागाच्या वतीने निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने प्रभाग रचना, मतदार यादी प्रकाशन आदी घडामोडी या युध्द पातळीवर सुरु असल्याचे वास्तव्य शहरातील तसेच राज्यातील विविध स्तरावरुन पहावयास मिळत आहे.

 

 

 

सद्या महायुतीचे शासन हे राज्यात कार्यरत असल्याने राज्यामध्ये दुबार मतदार या धर्तीवर विरोधांकानी रान उठवले आहे. ही वास्तविकता असतांनाही याबाबत राज्य निवडणुक आयोग कुठलाही ब्र काढण्यास तयार नसले तरी यावर भाजपाचे नेते मात्र वेगवेगळ्या स्वरुपात भाष्य करीत असल्याचे प्रसार माध्यमातुन दिसून येत आहे.

 

 

राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने निवडणुकीची पुर्व तयारी करण्यात आली असून नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगर पालिका असा निवडणुकाचा निर्देश असल्याचे आता दिसून येत आहे. कारण याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 30जानेवारी 2026 पर्यंत आटोपण्यात याव्यात या निर्देशानुसार राज्य निवडणुक आयोगाची वाटचाल सुरु असली तरी मतदार याद्यांचा घोळ, मतदारांच्या सिंमाल्लांेघन हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने राज्यभरात विरोधकांकडून निवडणुक आयोगाला वेठीस धरण्यात आले आहे. तर प्रशासनातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे हे सत्ताधाऱ्यांचे हित साधत असल्याचा दावाच सद्या विरोधाकडून होत असल्याचे वास्तव्य आहे. आणि ते सिध्द करण्याकरीता विरोधकांकडे सुध्दा बहुतांश मुद्दे असले तरी या गडबडीत सत्ताधारी पक्ष आपल्या प्रभाग रचना आणि इतर कामामध्ये व्यस्त असल्याचे पहावयास मिळते यावेळी होणाऱ्या निवडणुकीकरीता भाजपा व महायुती ची व्युहरचना ही नक्कीच वेगळी असल्याचे वास्तव्य पहावयास मिळत आहे.

 

ही बातमी वाचा – बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 

सद्या  राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेण्याचे नियोजन निश्चीत झाले असून आज सांयकाळच्या वेळेस राज्यात निवडणुकीची आचार संहिता घोषीत होवून निवडणुक कार्यक्रम घोषीत होणार असा दावा आता राजकीय वर्तुळातील तज्ञांकडून व्यक्त होवू लागला आहे.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

राज्य निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहिता आणि निवडणुक कार्यक्रमाची घोषणा एवढेच संकेत दर्शवित आहे. तरी आज दुपार नंतर राज्यामध्ये निवडणुकीची आदर्श आचार संहिता घोषीत होवून निवडणुक कार्यक्रम आखला जाणार आहे. तरी आज प्राप्त पत्रानुसार व संध्याकाळच्या पत्रकार परिषदेतुन हे समोर येणार आहे.!

Scroll to Top