शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय

संकुलातील शौचालयाला ताला, सांडपाण्याच्या लेआऊट बाबत दुर्लक्षता भोवली

शेगांव- शेगांव  नगर परिषद हद्दीत राहत असलेल्या नागरिकांंना मुलभुत सुविधा देण्याकरीता असलेले शेगांव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शेगांव नगर पालिकेच्या मालकीच्या आठवडी बाजारात निर्मीत संकुलामध्ये असलेल्या शौचालयास बंद केल्यामुळे तसेच येथील व्यवस्थापनाबाबत नगर परिषद प्रशासनाची दिंरगाई ही उघड झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

शेगांव नगर परिषदेच्या माध्यमातुन व्यवसायिक दृष्‍टीकोनातुन व्यवसायिकांसाठी  उभारण्यात आलेल्या संकुलाची निर्मीती हा नगर परिषद प्रशासनाचे उत्पन्न वाढविण्याचा स्त्राेत जरी असला तरी या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील संकुलाची स्थितीच ही चक्क शौचालयासारखी झाली आहे. या परिसरातील व्यवसायिकांकरीता लघुशंका व शौचालय निर्मीती करीता  उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या निर्मीतीकरीता व सुविधा साठी उभारण्यात आलेल्या शौचालयाला कुलुप लावण्यात आल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळते आणि त्यामुळे दुमजली उभारण्यात आलेल्या संकुलाचा वापर हा आता शौचालयाच्या विधीसाठी होत असल्याचे वास्तव्य आता समोर आले आहे.

 

ही बातमी वाचा –शेगांवात 92 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार

 

आठवडी बाजार परिसर हा शेगांव शहराच्या मध्यभागी असला तरी या ठिकाणी व्यवसायिकांंसाठी महत्वाचे ठिकाण असले तरी या ठिकाणी घाणीचे दुर्गंध निर्माण झाले आहे. या परिसरातील व्यवसायिकांनी वारंवार नगर परिषद प्रशासनाच्या आरेाग्य विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या असल्या  तरी नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभाग पगारापुरताच असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया या व्यवसायिकांकडून निर्माण होत आहे.

 

नगर पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची निर्मीती केली असली तरी येथील सांडपाण्याच्या निचारा होण्याबाबत अनभिज्ञता असल्याची माहिती मिळाली आहे. या अगोदर या सांडपाण्याचा निचरा हा कृउबास च्या दिशेने होत होता. त्यावर त्या व्यवस्थापनाने अंकुश लावल्यामुळे येथील शौचालयाला तर चक्क कुलुप ठोकले आहे.  नागरी  आरेाग्यासाठी शौचालय व मुत्री घरे हा महत्वाचा भाग असला तरी त्याबाबत कानाडोळा होत असल्याने या व्यवसायिकांना या ठिकाणी व्यवसाय करणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभारात अधिकाऱ्यांची मनमानी ही व्यवसायिकांची डोकेदुखी ठरत असल्याचा संताप व्यक्त करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे व्यवसायिक सांगत आहेत.

 

या संकुलामध्ये मटन विक्रेत्यांना व्यवसाय सुरु करु करण्याकरीता न.प.च्या वतीने या दुकानाची हऱाशी सुध्दा करण्यात आली होती. काही दिवस हे मटन व्यवसायिक या ठिकाणी आपला व्यवसाय थाटुन बसले असले तरी पुन्हा उघड्यावर अतिक्रमण करुन या ठिकाणी दुर्गंधी केल्यामुळे या परिसरात मंसाहर न करणाऱ्या नागरिकांचा अभाव असल्याने या व्यवसायिकांचे ग्राहकाअभावी कंबरडेच मोडल्याची वास्तविकता असतांना या भागात स्वच्छतेचा अभाव हा कायम चा प्रश्न बनला आहे. परंतु याकरीता  नगर परिषद प्रशासनातील अधिकारी यांची दिरंगाई या आठवडी बाजारातील संकुलाच्या दुरावस्थेला कारणीभुत असल्याचा दावा ठोकण्याची वेळ आल्याची प्रतिक्रीया ही जनमानसात उमटत  आहे.

 

याबाबत जिल्हाधिकारी यांंच्याकडे सुध्दा तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासन संबधित स्थानिक प्रशासनाला अंमलबजावणीचे निर्देश देत असल्याची बतावणी नेहमीच्या तक्रारीवरुन दिसून आली असली तरी कारवाई ही फक्त कागदोपत्रीच असल्याचे भिषण वास्तव्य संतप्त प्रतिक्रीयातुन समोर आले आहे.

Scroll to Top