शेगांव शहरात गो.नि.देशमुख सरांचे ” गुरु ग्लोबल प्रि स्कुल” ठरतेय आकर्षण
शेगांव- शेगांव शहराच्या शिक्षण क्षेत्राचा उल्लेख झाला की, आदर्श मुख्याध्यापक म्हणून ज्यांचे नाव निघते ते म्हणजे गो.नि.देशमुख…
शेगांव शहरात तब्बल 4 दशकापासून शिक्षणक्षेत्रामध्ये व नव्याने सुरु असलेल्या बुरुंगले शिक्षण संस्थेच्या रोपट्यापासून ते समृध्दीमय वाटचालीत सहभागी असणारे गो.नि. देशमुख यांच्या व्यवस्थापन आणि संस्थेचे अध्यक्ष स्व. ज्ञानेश्वरजी बुरुंगले यांच्या असलेल्या पाठबळातुन शेगांवात शिक्षण संस्थेत आदर्श निर्माण करण्याची किमया त्यांना साधता आली. आणि चार दशकामध्ये त्यांच्या हाताखाली शिकलेली मुले आज देशाची नागरिक झाली आणि त्यामधली बहुतांशी हे विविध क्षेत्रामध्ये सर्वगुणसंपन्न असल्याचे वास्तव गो.नि. देशमुख सरांनी आपल्या डोळ्याने पाहिले असल्याने त्यांच्या कतृत्वाचा स्वाभिमान हे त्याच्या दैनंदिन शैलीतुन पहावयास मिळत असतो.
जिवनाच्या वाटेवर संघर्ष असावा व परंतु तो इतकाही नसावा त्या संघर्षाला संपविण्याचे काम संपुर्ण आयुष्यामध्ये गो.नि.देशमुख सर यांच्या कार्यशैलीचा भागच म्हणावा लागेल. प्रारंभीला बुरुंगले शिक्षण संस्थेची संकल्पना मांडतांना स्व. ज्ञानेश्वरजी बुरुंगले यांनी दिलेल्या समर्थ साथीच्या आधारावर बुरुंगले परिवाराने शिक्षण संस्थेची उभारणी करण्यासाठी त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सुध्दा दिली. शेतकरी कुटुंबातील परंतु शिक्षणाचा वारसा लाभलेल्या देशमुख कुटुंबातील संस्कृती, संस्कार, आदर्श त्यांच्या कतृत्वशैलीतुन प्रत्येक घराघरात पाेहचला आहे तो विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन विविध क्षेत्रात नावलौकीक करणारे नागरीक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरल्याचा सार्थ अभिमान सरांच्या चेहऱ्यावर झळकत असतो.
ही बातमी वाचा –शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे
आणि सेवा निवृत्तीनंतर आता नव्याने शिक्षण क्षेत्रात नव्या युगाची नवी दिशा घडविण्याच्या दृष्टीने सरांनी फक्त शाळेच्या संकल्पनेचा विचार मांडला असतांना त्या शाळेत शिकणारा आपला पाल्य हा नक्कीच नव्या युगाचा नवतरुण बनेल असा आशावाद पालकांना असणे हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. बालवयात लहान मुलांना संस्कार, संस्कृती व अादर्श चे पैलु पाडण्याचे काम सरांच्या माध्यमातुन नक्कीच होणार असा आशावाद नव्या युगाचा नवा संकल्प आणि तो सुध्दा सेवानिवृत्तीनंतर केल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे नव्या पिढीला लाजिरवाणे ठरविणारे असल्याचे कोणीही नाकारु शकत नाही एवढे मात्र निश्चीत.
आणि त्याची वैशिष्टये-
* मनाची, बुध्दीची व संस्काराची शाळा
* नो डोनेशन
* डीजीटल स्कुल
” गुरु ग्लोबल प्रि स्कुल” संकल्पनेला आमच्या मनपुर्वक शुभेच्छा..
