शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनीधी हा जनतेचा लोकसेवक असावा असा कयास असला तरी विविध विचारधारेवरुन नगरसेवक बनुन नगर पालिकेत विराजमान झाल्यानंतर नागरिकांच्या मतांचा आदर न करता आपली आर्थिक दावेदारी प्रबळ करण्याच्या दृष्टीने नगरसेवक पदाची उमेदवारी दाखल करणाऱ्या वा तसा दृष्टीकोन संभाळणाऱ्या नेतृत्वांना यावेळी निवडणुकीच्या रिंगणातुन कलाटणी देण्याची भाषा नागरिकांकडून वर्तविली जात आहे. नगरसेवक, पक्षनेते यांची जनसेवा हा जरी दिखाव्याचा भाग असल्ा तरी ठेकेदारीसाठी वाटेल ते करणाऱ्यांची गर्दी या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र आहे. तर दिखाने के अलग अन खाने के अलग या धर्तीवर वाटचाल करणाऱ्या उमेदवारांना नक्कीच जनता कलाटणी देण्याच्या भुमिकेत असल्याची चर्चा जनसामान्यातुन ऐकावयास मिळत आहे. तर नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेचा हिशोब मागण्याची वेळ आल्याची चर्चा नागरिकांमधून होत अाहे.
राज्यात नुकत्याच महायुतीच्या निर्मीतीच्या वेळी विविध विचारधारेवर निवडुन आलेल्या आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडी तोडीत नव्याने महायुतीच्या माध्यमातुन सरकार स्थापन केले. अ ाणि लोकशाहीला गालबोट लावले असल्याचे जनसामान्याच्या चर्चेतुन समोर आले असले तरी जनतेच्या विरोधात असलेली आमदारांची भुमिका ही जनहिताची नसुन ती स्वतःच्या स्वार्थाची आणि सत्ताकारणासाठी असल्याचे पुढे आले होते.
तर तोच प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच तालुक्यातील मिनी मंत्रालय असलेल्या नगर पालिकेत सर्रास होत असतोे. आज जरी विरोधात निवडणुक लढत असले तरी सत्तास्थापन झाल्यावर सब खायेंगे मिल बाटके या धर्तीवर नगरसेवक आणि सभापती महोदयांच्या बैठकी रंगत असतात. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक या धर्तीवर आणाबाणा, शपथा, वचननामे सादर करुन मतासाठी ऐनवेळी मनी पावरचा सर्रास वापर करण्यास कुठलीच कसर ठेवत नाही. एवढेच नाही तर निवडणुकीतुन सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने निवडणुक काळात अमिषाच्या आशेवर ही खुर्ची हाती घेवून सत्ताकारणाच्या डावात ठेकेदारीच्या गोंडस नावाखाली प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विकासकामे आणि त्यातील कमिशनवर डल्ला मारत केलेला प्रकार हा संपुर्ण राज्यात सर्वांना परिचीत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या 10 ते 15 वर्षाच्या कार्यकाळात आर्थिक उत्पन्न, आणि मालमत्तेत वाढ होण्यासाठी असलेल्या उत्पन्नाचा दर हा सुध्दा संशोधनाचा विषय आता सुजाण नागरिकांच्या नजरेतुन चुकला नाही.
ही बातमी वाचा – राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर
अनेकांनी तर नगरसेवक असतांना नाममात्र ठेकेदार नेमुन कोट्यावधीची माया जमवली आहे. आणि प्रसारमाध्यमासमोर मात्र जनसेवकाचे आवरण हा सर्वांना सुपरिचीत आहे. तरी होवू घातलेल्या निवडणुकीत ठेकेदारी वृत्ती जोपासण्याची भुमिका असणाऱ्या उमेदवारांना जनता कलाटणी दिल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा आता जनतेतुन सुरु आहे.
