लोकशाहीचा महत्वपुर्ण भाग असलेल्या राजकारणाचा समाजहितासाठी फायदा व्हावा हा उद्दात हेतु असला तरी मंत्रालयात आपला प्रतिनिधी पाठविण्याच्या दृष्टीने निवडणुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विचारधारेला जय महाराष्ट्र करीत स्वतःच्या स्वार्थाकरीता वाटेल ते करण्याचा थाट सर्व महाराष्ट्र वासीयांनी अनुभवला असला तरी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी हे जनसमान्यांच्या सेवा करण्याच्या आणा बाणा घेवून सत्तेत येतात. आणि नगरसेवकाच्या नावाखाली आपली आर्थिक दुकानदारी सुुरु करतात.
यामध्ये काही नगरसेवक अपवाद वगळता बहुतांशी यात जुळलेले असतात. प्रत्येक विकास कामामध्ये यांचा कमिशन टक्का असतोच एवढेच नाही तर अनेक कंत्राटी कागदोपत्री असतात. ती जरी कुणाच्याही नावाने असली तरी त्या प्रभागातील नगरसेवकच या त्या कंत्राटादाराचा भागिदार असल्याचा अनुभव आता जनता बोलु लागली आहे.
ही बातमी वाचा –प्रभाग क्र.2 मध्ये लाहुडकर यांच्या रुपाने मनसे इंजिन धावणार!
प्रभागाच्या विकास कामाच्या निवीदा सुध्दा मॅनेज करण्याकरीता सर्वच नगर सेवक एकत्र मिळून अपेक्षित व्यक्तीलाच संबधित कंत्राट देण्याचा घाट रचतात. नाव कुणाचे आणि आर्थिक लोणी खातय कोण असा असंख्य बाबी आता चर्चेचा विषय ठरत आहे. वृक्षारोपण असो, विकास काम असो, मुलभुत सुविधा पुरविणे असो वा दुरुस्तीचे कंत्राट असो यामध्ये नगरसेवकांची भागिदारी हा नित्याचा विषय ठरलेला पहावयास मिळत असल्याचे जनतेतुन समोर येवू लागले आहे. पदाच्या कार्यकाळात स्वतःच्या नावावर शक्य नसल्याने नातेवाईक, आप्तेष्ठ यांना सुध्दा कोट्यावधीचे कंत्राट देवून चांगभल केल्याचा इतिहास उघडला जावू शकतो. आणि इतके असतांनाही यांना पुन्हा या सत्तेची हाव कमी झालेली दिसत नाही तरी माजी नगरसेवकांची मालमत्ता कशी वाढीव झाली याबाबतचे ऑडीट व्हावे असे बोलल्या जावू लागले आहे. एवढेच काय नगरसेवक वा नगराध्यक्ष या पदाची गरीमा सुध्दा ही लयास गेल्याचे आता जनतेतुन उघड होवू लागले आहे. त्यामुळे ही चर्चा आता जनसमान्यात जरी असली तरी ती प्रसार माध्यमातुन सुजाण नागरिक व्यक्त करण्यास डगमगणार नसल्याच आता जाणवू लागलं आहे.
शेगांव– शेगांव नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने मागील 9 वर्षाच्या काळामध्ये पाच वर्षाची सत्ता आणि त्यांनंतरच्या प्रशासकीय कार्यकाळात या प्रभागाचे लोकप्रतिनिधीत्व केलेल्या माजी नगरसेवकांच्या मालमत्तेेचे ऑडीट व्हावे अशी मागणी जनतेतुन होवु लागली आहे.
आजस्थितीला मालामाल व महागड्या वस्तु तसेच मालमत्ता खरेदी केेलेल्या त्या लोकप्रतिनिधींची चौकशी हा सुध्दा गांर्भीयाचा विषय आता चर्चेचा ठरु लागला आहे. आणि कुठल्याची अधिकृत व्यवसाय नसतांना त्या लोकप्रतिनिधींनी माया जमवली कुठुन अाता असेही बोलल्या जावू लागले आहे. नाव कुणाचे आणि कंत्राट हे नगरसेवकांचे असे अनेक दाखले आता देण्यासही जनतेकडून तयारी असल्याचे आता पहावयास मिळत आहे.
मुलभुत सुविधा आणि विकासकामांमध्ये गोंधळ निर्माण करुन अनेकांनी आपली तिजोरी भरली असून होवू घातलेली निवडणुक ही जनसमान्यांच्या सेवेकरीता की, प्रतिष्ठेकरीता लढणार आहेत. असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. माजी नगरसेवकांनी अनेकदा सत्ता उपभाेगली असली तरी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सुध्दा आता जनतेतुन बोलल्या जावू लागले आहे. तरी ही निवडणुक जनसमान्यातील कल पाहता आज स्थितीला युवकांनी व विशेषतः नव्या चेहऱ्यांनी फिरविण्याचे वातावरण आज पहावयास मिळत आहे.
तरी विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळीनी आज स्थितीला नव्या युवा पिढीला संधी द्यावी अशी मागणी जनतेची असली तरी शेगांवात प्रबळ असलेले पक्ष नेमके कोणला उमेदवाराची संधी देतात हा येणारा काळ ठरविणार असला तरी माजी नगरसेवकांच्या मालमत्तेची चौकशी हा सुध्दा महत्वाचा मुद्दा आहे. कारण जनसामान्यांच्या सेवा देण्याच्या नावाखाली नगरसेवक पदाची आर्थिक उत्पन्नाची दुकानदारी ही सुरु असते. आणि त्यामुळे मुलभुत सुविधेतही सावळा गोंधळ झाल्याचे बोलल्या जाते. तरी आता या निवडणुकीत वारं वेगळ्या दिशेने वाहणार असल्याच्या प्रतिक्रीया आता उमटू लागल्या आहेत.
