देशाच्या भाैगोलीक आराखड्यानुसार मुंबईपासून कोलकता मार्गावर असलेल्या बुलढाणा जिल्हयातील रेल्वे वाहतुकीसाठी मलकापूर, नांदुरा, शेगांव अशा स्थानकांचा समावेश असला तरी गरीब रथ नागपुर- पुणे या गाडीला मलकापूर येथे थांबा मिळाला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याची माहिती मिळाली आहे.
रेल्वे विभागाच्या वतीने मलकापूर येथे थांबा देण्यात आला आहे. मलकापूर येथे नागपुर आणि पुणे जाण्याकरीता या ठिकाणी थांबा मिळावा अशी मागणी येथील प्रवाश्यांसह व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने सुध्दा करण्यात आली होती. तरी रेल्वे विभागाच्या वतीने मलकापुर रेल्वे स्थानकावर नागपूर-पुणे या गरीब रथ एक्सप्रेसचा थांबा मंजुर केला आहे. सदर थांबा हा प्रयोगिक तत्वावर असल्याचे सुध्दा कळविले आहे.
ही बातमी वाचा –जन्मदाता बापच आपल्या मुलाचा मृतदेह घेवून तक्रारीसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात
मलकापूर येथील व्यापारी, व्यवसायिक तसेच बुलढाणा व परिसरातील नागरिकांना नागपूर पुणे जाण्याकरीता भुसावळ अथवा जळगंाव अशा स्थानकावरून गाडीत बसण्यापेक्षा सदर थांब्यामुळे ते सोयीचे होणार असल्याने प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरी हा थांबा 24 अॉगस्टपासून सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गाडीचे वेळापत्रक असे राहील.
गाडी क्र. 12114 नागपुर पुणे ही मलकापूर स्थानकावर दि. 24 ऑगस्टपासून रात्री 11 वा.17 मि. पोहचेल थांब्यानंतर पुढील प्रवासाकरीता निघेेल
तसेच गाडी क्र.12113 पुणे नागपूर गरीब रथ ही गाडी 25 ऑगस्टला पहाटे 3वा 14 मि. ला मलकापूर स्थानकावर पोहचेल थांबा झाल्यावर नागपूरकडे मार्गस्थ होईल.

Comments are closed.