जामखेडच्या आमसभेत प्रशासनावर ताशेरे ओढत, जनतेला न्याय देण्यासाठी आ. रोहीत पवार संतापले
आज महाराष्ट्राचे राजकारण हे वेगळ्या वळणावर गेले असले तरी आपल्या मतदार संघातील जनतेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या ही जरी एका बोटावर मोजण्याइतकी असली तरी आ. रोहीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गाजलेली जामखेडची आमसभा ही नक्कीच जनतेच्या हक्काची असून आपण लोकसेवक असल्याचा प्रत्यय या सभेतील आ. रोहीत पवार यांच्या परखड वक्तव्यातुन समोर आला आहे.
जामखेड येथे आज झालेल्या आमसभेमध्ये स्थानिकांच्या समस्याबाबत व्यथा मांडत असतांना तेथे कार्यरत अधिकारी हे उडवाडवीची देत असल्याचे दिसून आल्यावर बसलेले आमदार रोहीत पवार यांनी संतप्त व अाक्रमक भुमिका घेत आपली भुमिका मांडत जनतेला न्याय देण्याकरीता अाक्रमक रुप धारण केले.
ही बातमी वाचा –तुझी चड्डीही जागेवर ठेवणार नाही- शिवाजी वाटेगकरांचा इशारा
आजच्या आमसभेमध्ये जामखेड परिसरात झालेल्या विकासकामाबाबत स्थानिक आक्षेप नोंदविला असतांना त्या विकासकामावर सुरपवायझर नसल्याची बतावणी तेथे उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असली तरी त्या तेथे कार्यरत अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे या अामसभेत उपस्थित आ. रोहीत पवार यांच्या निर्दशनास आले.
ये अातापर्यंत काय गोट्या खेळत होता काय? ही लोक काय वेडी लोक आहेत काय? खिश्यातला हात काढ आधी, मिजासखोर तु बोलु नको इथं.या लोकांनी दाखवलेले काम अामच्याकडे आलं आहे. हा काय तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकंाचा पैसा आहे. तु कुठलाही असशील मात्र इथ यांना राहायचं आहे. या लोकांनी जी कामे दाखविली आहेत ती खराब कामे आहेत. उद्या बघतो, उद्या करतो, तुमचे आणि तुमच्या अधिकाऱ्यांचे पराक्रम माहीत अाहेत. मुकाट्याने ऐकूण घे नाही तर ही जनता तुला उघड्यावर सोडणार नाही.
अशा आक्रमक भुमिकेत जनहितासाठी धडपणारा आणि जनतेला न्याय देण्याकरीता तब्बल 6 तासाची आमसभा आणि परिसरातील जनतेला ऐकुण घेण्याची आमदार रोहीत पवार यांची भुमिका ही नक्कीच लोकप्रतिनिधीसाठी आरसा असल्याचे वास्तव्य या आमसभेतुन अनुभवयास मिळाले अाहे हे विशेष.
एवढेच नाही तर या अधिकाऱ्यांनी अवघ्या 12 दिवसाच्या आत सर्व प्रश्न निकाली लावावेत असे आदेश आमसभेत खुले आम देणारे आमदार रोहीत पवार यांना लोकांची पसंती आहे.
आमसभा ही जरी नगर परिषदेशी संबधित असली तरी त्या गावपातळीवर असलेल्या प्रत्येक मतदाराला आपल्या अडचणी मांडण्यासाठी असलेली आमसभा ही खरोखरच जनतेला न्याय देण्याची असल्याची वास्तविकता आजच्या आमसभेतुन पहावयास मिळाली आहे. तर गरीब, अनाथ, एवढेच नाही तर एसटी बस प्रवास करणाऱ्या वयोवृध्दांची समस्या सुध्दा सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. तर घंटागाडी पासून ते प्रभागामध्ये मुरुम टाकण्याच्या छोट्या मोठ्या समस्या जाणून घेण्याच्या आमदार रोहीत यांचा परखडपणा हा नक्कीच वाखणण्याजोगा आहे.