शेगांव– होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता मतदारांची नव्या चेहऱ्याला पसंती असल्याचे वास्तव्य अनुभवयास येत असून हाेवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकार यावेळी प्रभाग क्र.2 मधून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचा या प्रभागातील जनतेचा कल असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभाग क्र. 2 मधील सर्व सामान्य आणि गोरगरीबांच्या अडी अडचणी सोडविण्याकरीता तत्पर अ सलेले परमेश्वर लाहुडकर यावेळी यांनी नगरसेवक पदाची निवडणुक लढवून या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करावे अशी मागणी चाहत्या मतदारांकडून होणार आहे.
ही बातमी वाचा –प्रभाग क्र.1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात!
मागील निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भाजपाने आपला झेंडा कायम गाडला असून काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले आहेत. तरी यावेळी काँग्रेस- भाजपा असे लढतीचे चित्र असतांना यावेळी प्रभाग क्र.2 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लाहुडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चर्चेत आहे.
या प्रभागाची सामाजिक व राजकीय समिकरणे पाहता मागील 9 ते 10 वर्षापासून या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लाहुडकर हे नहमीच अग्रेसर भुमिका घेतात. नागरी समस्या सोडविण्याकरीता त्यांचे वतीने अनेक आंदोलने करण्यात येवून नागरी समस्याचे निराकरण हे सुध्दा करण्यात आले असल्याने यावेळी प्रभाग क्र. 2 मध्ये मनसेचे इंजन धावणार असल्याचे चित्र आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
विविध धार्मिक कार्यक्रम आणि विविध समाज घटकांशी बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य एकनिष्ठतेने करणारे युवा नेते परमेश्वर लाहुडकर यांच्या नावाला पसंती मिळाली असून या होवू घातललेल्या नगर पालिका निवडणुकीची जय्यत तयारी त्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीत ते विजयाच्या वाटेवर वाटचाल करतील असा अाशावाद आता जनसमान्यातुन चर्चेचा ठरत आहे हे विशेष.
