मेडीकल महाविद्यालय प्रवेशाची गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला होणार प्रकाशित, 64 हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी.

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणे हा सुध्दा अत्यंत कठीण व सातत्यपुर्ण सरावातुन प्रवेशाच्या संधी उपलब्ध होतात. आणि ती पात्रता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला प्रसिध्द होणार आहे.

 

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वेळ पत्रकामध्ये बदल केल्यामुळे सीईटी सेल च्या वतीने मेडीकल तसेच डेंटन अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 8 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिली अंतिम गुणवत्ता यादी 13 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 64 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली आहे. 6 ऑगस्ट रोजी सीईटी सेल च्यावतीने गुणवत्ता यादी जाहीर करुन असलेल्या जागाबाबतचा तपशिल प्रसिध्द केला आहे. परंतु महाविद्यालयाचा पसंती क्रम भरण्यासाठी असलेल्या मुदतीत बदल करण्यात आल्याने नवीन वेळापत्रकानुसार मेडीकल आणि डेंटल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 8 ते 11 ऑगस्ट या कालवधीत महाविद्यालयाचा प्रसिध्द क्रम नोंदणी येणार आहे.

 

 

तरी पहिली गुणवत्ता यादी 13 ऑगस्ट 2025 ला प्रसिध्द करण्यात येणार आहे तर दि. 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जावून प्रवेश घ्यावयाचा आहे. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर एका महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्याचवेळी राज्य कोट्यातील प्रवेशप्रक्रीया राबविण्यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रीया सुरु केली आहे.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना फक्त विद्यालयाच्या पसंतीक्रमासाठी 8 ते 11 ऑगस्ट हा कालावधी आहे.

Leave a Comment