Malvadi Radha

बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

देशातील नव्हे तर जगभरात सर्वात बुटक्या जिवंत व पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्हयातील माण तालुक्यात असलेल्या मालवडी येथील राधा चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाेंद झाली असल्याने तिला पाहण्याकरीता अनेकांना उत्सुकता लागली आह. आणि त्यामुळे प्रत्येक प्रदर्शनात ती चे आकर्षण वाढत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

मालवडी येथील रहिवाशी शेतकरी तसेच पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्या म्हैशीच्या पोटी 19 जून 2022 रोजी राधाचा जन्म झाला. राधा दोन अडीच वर्षाची झाल्यानंतरही तिच्या उंचीतील बदल त्या शेतकऱ्यांच्या लक्षात त्यानंतर बोराटे याचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने राधा ला विविध कृषी प्रदर्शनात सहभागी करण्यास सुरुवात केली असली तरी प्रारंभीला कुठल्याच प्रदर्शनीत त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

 

बुटक्या जिवंत म्हैस (राधा) ने 21 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी प्रदर्शनीत सहभाग नोंदविताच तिचा सगळीकडे बोलबाला सुरु झाला. तेव्हापासून मलवडीच्या राधाला विविध कृषी प्रदर्शनीमध्ये आमंत्रित केल्या जावू लागले . पुसेगांवची सेवागिरी कृषी प्रदर्शनी, कर्नाटक राज्यातील निपाणी प्रदर्शनी याच्यासह तब्बल 13 कृषी प्रदर्शनीत बुटक्या राधाचे खास आकर्षण असल्याने तीला निमंत्रीत करण्यात येवू लागले.

 

ही बातमी वाचा – एसआयपी धारकांनी बाळगावा संयम;घसरणीचा काळच ठरतो सोन्यासारखा!

 

तर या बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) दि. 24 जानेवारी 2025 रोजी इंडीया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली.त्यानंतर परभणी येत्‍ील कृषी प्रदर्शनीनंतर अनिकेत बोराटे याने राधाच्या गनिीज वर्ल्ड रेकाॅर्डच्या नोंदीसाठी प्रयत्न सुरु केले या कामी पशुधन विकास अधिकारी डॉ.शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 12 सप्‍टेंबर 2025 ला राधाची पाहणी करुन अहवाल पाठविला. त्यानंतर 20 सप्‍टेंबर ला कागदपत्रे सादर केली आहेण 28 ऑक्टोंबर 2025 रोजी राधा जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

विविध शेतकरी प्रदर्शनीसोबतच प्रसारमाध्यमातुनही जगभरातील सर्वात बुटकी जिवंत म्हैस म्हणुन आकर्षण कायम आहे.
बुटकी म्हैस – राधा
* जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस
*उंची- 83.8 सेमी (2फुट 8 इंच)
*ठिकाण- मलवडी, ता.माण,जि.सातारा, महाराष्‍ट्र

Scroll to Top