मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट

काँग्रेसच्या वतीने 35 लोकसभा मतदार संघात चौकशी

मतचोरीच्या मुद्यावर राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम!

नुकत्याच त्यांनी केलेल्या कथनानुसार राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यावरुन सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोग दोघेही ठोस काहीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. सद्या स्थितीला सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोगाच्या वतीने राहुल गांधीचे विधान निराधार करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत जरी असले तरी त्यांच्या प्रयत्नात आत्मविश्वाचा अभाव दिसतो. हेच पण तितकडे खरे आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वतीने उपस्थित केलेला मतचोरी चा मुद्दा सहजासहजी दाबला जाणार नाही. मतचोरीच्या मुद्दयावर काँग्रेस पूर्ण तयारीने मैदानात उतरली असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. पक्षाच्या वतीने आतापर्यंत मतचोरीचा फक्त एकच बॉम्बस्फोट केला आहे, तर देशभरात झालेल्या विविध मतदार संघातील मतचोरीचा मुद्दा बाहेर काढत निवडणुक आयोगांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तरी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला हल्ला निवडणूक आयोगावर असला तरी यामध्ये भाजपालाच लक्ष्य करण्यात येत असल्याचे जाणवते.

लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वतीने कर्नाटकातील बंगळूर मध्यवर्ती लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा येथे मतचोरीचा मुद्दा उपस्थित करीत हा फक्त नमुना असल्याचे त्यांनी म्हटले आहे हे संपुर्ण देशात घडल्याचा त्यांनी दावाच केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी हे विनाकारण सांगितले नाही. काँग्रेसच्या वतीने 35 लोकसभा जागांवर अशीच चौकशी करून सविस्तर अहवाल तयार केला आहे. त्यापैकी कर्नाटक मधील 25 आणि मध्यप्रदेशातील 7 जागा आहेत. हे काम अत्यंत गुप्तपणे करण्यात आले असून काँग्रेसमधील काही निवडक दोन-तीन नेत्याशिवाय कोणालाही त्याची कल्पना आली नाही.हेच कारण आहे की, राहुल गांधी कर्नाटकमधील महादेवपुरा येथील मतचोरीच्या स्फोटाची तिळमात्र कल्पना नव्हती. सत्ताधारी पक्षालासुध्दा त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही.

निवडणुक आयोगाच्या वतीने दाखविण्यात आलेला आढावा (SIR)वर संसदेमध्ये एकता दाखवल्यानंतर विरोधी पक्षामध्ये समन्वयाचा एक नवीन टप्पा सुरू होतांना दिसत आहे. कर्नाटक मधील कथीत मतचोरी वरील राहुल गांधी यांच्याकडून सादरीकरणाच्या वेळी विरोधी गटातील खासदारांकडून कौतुक केले आणि विरोधी आघाडी इंडीयाच्या ब्लॉकमध्ये हे वातावरण पुढे नेण्यासाठी सर्व विरोधकांची सक्रीयता मोठ्या जाेमाने काम करीत आहे.

गुरवारला राहुल गांधी यांनी त्याच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या प्रमुख नेत्यासाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होेते. त्यामध्ये बिहार विधासभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव देखील उपस्थित होते दरम्यान दोन्ही नेत्यांनी 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे होणाऱ्या काँग्रेस-राजद संयुक्त रॅलीसाठी सर्व पक्षांना आमंत्रित केले.जर सर्व नेते या मंचावर एकत्र दिसले तर निवडणुक वातावरणात विरोधी एकत्र येतील असा हा दुर्मिळ प्रसंग असेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुध्दा हे दृश्य दिसले नव्हते. पूर्वी विरोधी पक्षाचा असा मेळावा फक्त दोनवेळा दिसला होता.

दिली आणि रांचीमध्ये जेव्हा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंड चे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेविरुध्द निर्देशने करण्यात आली होती. पटणा रॅली देखील विशेष मानली जाते कारण त्यात केरळमध्ये काँग्रेस विरुध्द सीपीआय (एम) आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस विरुध्द काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते एकत्र मंचावर बसतांना दिसतील.

Leave a Comment