Marathi

मराठीचा मुद्दा भरकटवल्या जात आहे !

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मूळ मुद्दा हा आहे की इयत्ता पहिली पासून तिसरी भाषा असावी का ? आणि असल्यास हिंदीच कां असावी !

प्रथम भाषा ही मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असावी. (सर्वसाधारण संवादासाठी) दुसरी भाषा इंग्रजी (ज्ञानभाषा म्हणून) आणि तिसरी भाषा ऐच्छिक (बहुभाषिक देशात इतर भाषांची ओळख होऊन राष्ट्रीय एकतेची भावना वाढावी म्हणून) तिसरी भाषा लादता येणार नाहीं.

इयत्ता पहिली पासून या तीनही भाषा अनिवार्य असाव्यात का ?

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षण कसे असावे याचा प्रथम विचार केवळ महात्मा गांधी यांनी केला होता. नई तालीम चा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली, सरदार पटेल, विनोबा भावे, आर्यनायकम, कुमारआप्पा, मौलाना अबुल कलाम आझाद यांचे योगदान होते. ज्याला आपण मुलोद्योगी शिक्षण पद्धती किंवा नई तालीम (basic education system) या नावाने ओळखतो.

भाषा शिकण्याच्या अनिवार्य आणि क्रमाबद्ध तीन पायऱ्या असतात.

1) श्रवण (केवळ भाषा ऐकणे)
2) संभाषण (बोलण्याचा प्रयत्न करणे)
3) लेखन (व्याकरण)

ही बातमी वाचा- बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट

आम्ही आमची मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा याच टप्प्यातून शिकतो.

(माझ्या निरीक्षणानुसार इंग्रजी करिता हाच क्रम आम्ही उलट दिशेने वापरतो. त्यामुळे इंग्रजी भाषा शिकण्यात समस्या निर्माण होतात.)

वय वर्षे सहा किंवा सात. विद्यार्थ्यांच्या हाताचे स्नायू लेखनासारखे कौशल्य पूर्ण काम करण्यास तयार झालेले असतात. (सहा वर्षाच्या आतील मुलांना हातात लेखण, पेन्सिल इत्यादी लेखन साहित्य देऊ नये असे नई तालीम सुचविते ! आम्ही वयाच्या अडीच वर्षापासून मुलांवर काय अन्याय करतो ते लक्षात घ्या !)

विषय मोठा आहे !
भारतातील कोणत्याही एका प्रादेशिक भाषेची सक्ती करणे योग्य नाहीं.

अनेक वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी समजत नाही असे म्हणणारे खोटे आहेत.माझे अनेक अमराठी स्नेही, मराठी बोलू किंवा लिहू शकत नाहीत परंतु मी बोललेले मराठी त्यांना समजते !मराठी भाषा समजल्याशिवाय महाराष्ट्रात आलेला कोणताही परप्रांतीय धंदा, नोकरी करू शकणे शक्य नाही !

बाकी पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती हा निर्णय शिक्षण तज्ञांचा नक्कीच नाही !

– सौ. नंदा उदापूरकर,
श्री अ खि नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,खामगाव

Comments are closed.

Scroll to Top