मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्ताकारणात सक्रीय असलेल्या मित्र पक्षांची युती यावेळी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुटली असल्याचे वास्तव आता पहावयास मिळत आहे. राज्यात सत्ताकारण करण्याकरीता सुरु असलेल्या महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत युती घडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेला भुकंप हा जरी महत्वाचा असला तरी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीत जागा वाटपाचा फार्म्युंला जुळला नसल्याने यावेळी युतीची एका दोन जागेवर नव्हेतर  राज्यातील 14 महानगर पालिकामध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली आहे.

 

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची राज्यातील

 

१४ महानगरपालिकांमध्ये युती तुटली आहे.  त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अकोला, लातूर, परभणी, सांगली, धुळे आणि जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दोन्ही पक्ष आता एकमेकांविरुद्ध स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यामुळे राजभरात अनेक चर्चेला उधाण आले आहे.

 

  • सदर युती ही फक्त जागावाटपावरून दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
  •  हे पण वाचा… रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक

  • राज्याच्या इतर भागात युती तुटली असली तरी, मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC)भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे. मुंबईत भाजपने १३७ तर शिंदे गटाने ९० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर यावेळी रिपाई आठवले गटास भाजपाच्या वतीने सन्मान दिला नसल्याने  यावेळी अंतिम टप्प्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तब्बल 39 उमेदवार स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काही भागामध्ये रामदास आठवले यांचे चाहते असून आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचा परिणाम युतीच्या मित्र पक्षांवर होईल. कारण ही निवडणुकीत 100-200 मतांना सुध्दा महत्व असल्याने यावेळी भाजपा व शिवसेना शिंदे गट याठिकाणी काय भुमिका घेणार हे येणाऱ्या काळात दिसून येईल.
  • या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतीचे चित्र तयार झाले आहेत. पुण्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांची संयुक्तीक लढत महत्वपुर्ण असल्याचा बोलबाला आहे.

यामुळे अनेक शहरांमध्ये आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत न होता, तिरंगी किंवा चौरंगी सामने पाहायला मिळतील.

Scroll to Top