पितृपक्षामध्ये हिंदु रितीरिवाजाप्रमाणे आपल्या पितृंच्या पुजनाचा मास असला तरी गणेशोत्सवाप्रमाणे या पितृपक्षामध्ये सोन्याची मागणी वाढली असल्याचे चित्र मागील आठ दिवसात बाजारपेठेत झालेल्या सोने चांदीच्या खरेदीवरुन पहावयास मिळत आहे. गेल्या आठ दिवसाच्या बाजारपेठेच्या अंदाजानुसार सोने हे 5562 रुपयांनी महागले असल्याचे समोर आले आहे. अशी माहिती इंडीया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिऐशन कडून प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
मागील आठ दिवसाच्या काळात सोने 5 हजारपेक्षा जास्त महागले असले तरी पितृपक्षातही सोने व चांदीचे दर वाढत असले तरी त्याचा कुठलाच परिणाम सराफा बाजारात झाला नसल्याचे दिसून येत असल्याची माहिती सराफा बाजारातील प्रमुखांनी दिली आहेे.
ही बातमी वाचा –समृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतच सत्य आलं समोर
सराफा बाजारातील महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील सराफा बाजारामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 13 हजार 400पर्यंत पोहचल्याची माहिती असून आता दागिने बनविण्याच्या मजुरीसह दहा ग्रॅम सोन्याला 1 लाख 26 हजार 802 रुपये मोजावे लागणार आहेे.
आता एक ग्रॅम सोन्याचे दागिने बनविण्याकरीता असलेली मजुरी ही एक हजार रुपये आहेे. त्यामुळे दहा ग्रॅम करीता दागिने बनविण्याची मजुरी दहा हजार तसेच दहा ग्रॅम वरील जीएसटी तीन टक्के म्हणजे 3 हजार 400 रुपये अाकारण्यात येत असल्याने ही दरवाढ असल्याची कळते. तरी आॅक्टोंबर महिन्यात दिवाळी तसेच होवू घातलेल्या लग्नसराईकरीता बाजारपेठेमध्ये दागिने बनविण्याच्या ऑर्डर ॲडव्हांंस मध्ये दिल्या आहेत. तरी सोन्याच्या बाजारपेठेवर पितृ पक्षाचा कुठलाही परिणाम झाला नसून सोन्याच्या दरात वाढ झाली आहेेे.

Comments are closed.