केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार वाढत्या महागाईला अनुसरुन अपंग व निराधारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ केल्याची घोषणा करुन तब्बल 3 महिने उलटले असले तरी अद्यापपर्यंत एकही वाढीव निधीचा हप्ता बचत खात्यात जमा झाला नसल्याने अनेकांना वाढीव मानधन कधी मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
आजस्थितीला महागाईचा वाढता डाेंगर सर्वसामान्य माणसाला जिवन जगण्यासाठी डोकेदुखीचा ठरत असतांना निराधारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ केल्याच्या निर्णयाचे निराधार व अपंगाकडून स्वागत करण्यात आले असले तरी अद्याप पर्यंत निधीची प्रतिक्षा करावी लागत असल्याची कुजबुज आता सर्वोतोपरी होवू लागली आहे.
ही बातमी वाचा – विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप
प्रारंभीला हा मानधनाचा आकडा 1500/- रुपये इतका होता आणि तो वाढीव झाला असून तो तब्बल 2500/- रुपये झाला आहे या वाढीव मानधनाची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी झाली असली तरी नव्या टेक्नॉलॉजीनुसार आता हे रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे संकेत असले तरी अद्यापपर्यंत एकही हप्ता न जमा झाल्याने सर्वांना वाढीव हप्त्याची अपेक्षा असतांना सुध्दा हा मानधनाचा वाढीव हप्ता कधी मिळणार याची अतुरता लागलेली असल्याची वास्तविकता आता लाभार्थ्यांकडून पहावयास मिळत आहे.
याबाबत प्रशासकीय स्तरावर विचारणा केली असला आता हे मानधन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असा दावा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नेमका हा वाढीव निधी मिळणार कधी याची आस लागलेली आहे यात कुठलीच शंका नाही.
