महाराष्ट्र राजकारणात नेहमीच फटकेबाजी करणारे बच्चु कडू यांची भुमिका दिन दलीतांकरीता दर्जेदार असल्यामुळे मागील 20 वर्षाच्या संघर्षकाळामध्ये त्यांची जनतेप्रति असलेले भुमिका पाहता महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना मंत्रीपदाची माळ देण्यात आली. आणि त्या काळात त्यांना मिळालेला मान सन्मान ही त्यांच्या कामाची पावती असल्यामुळे सर्वोतोपरी त्यांचे कौतुक होत अभिनंदन सुुध्दा झाले.
परंतु महाराष्ट्रात शिवसेनेच्या भुकंपामध्ये सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत केलेली राजकीय खेळी ही मोठी अपेक्षाची वा सत्ताकारणाची असल्याचे त्यांना चांगलेच भोवल्याचे वास्तव्य आजवरच्या स्थितीतुन अनुभवयास येत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग हा यशस्वी होत असतांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी जुन्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपासोबत महायुतीचे नव्याने सरकार स्थापन केले. त्यामुळे महाविकास आघाडीचा बिमोड झाला. आणि हा बिमोड करण्याकरीता बच्चु भाऊ कडू यांची सुध्दा सक्रीय भुमिका असल्याचे जाणवल्याने त्यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बालेकिल्लात हार पत्कारावी लागली. कधी या गटात तर कधी त्या गटात अशी भुमिका ही जरी राजकीयदृष्टया महत्वाची वाटत असली तरी जनतेमध्ये असलेली आपलेपणाची छबी ही लयास गेल्याचे माजी आमदार तथा मंत्री बच्चु कडू यांना स्विकारावेच लागेल.
आणि महायुतीच्या मागील सत्ताकाळात अपंग मंत्रालयाचे अध्यक्ष पद देवून केलेली बोळवण ही जरी समाधानकारक नसल्याने पुन्हा बच्चु कडू यांनी महायुतीच्या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली असली तरी त्याचा प्रभाव आता जनसामान्यातुन दिसून येत नसल्याचे वास्तव्य पहावयास मिळते. ज्या बालेकिल्यात त्यांच्या बद्दल अपार श्रध्दा असलेल्या मतदार संघात त्यांना हार मानावी लागल्याने आता प्रहार संघटनेच्या माध्यमातुन सक्रिय भुमिका घेत ते राज्यात शेतकरी हिताचे आंदोलन करीत आहेत. त्यामुळे आजस्थितीला ना घर का ना घाट का अशा अवस्थेत असलेली बच्चु कडू यांना महायुतीच्या सत्ताकाळात दिलेली आश्वासने ही बोलाची कडी आणि बोलाचा भात ठरल्याने ऐन विधानसभा निवउणुकीमध्ये राज्यात तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुध्दा करण्यात आला असल्याने मतदार संघात असलेली विश्वासहर्ता ही लयास गेली असून त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन मतदारांकडून डावलत असल्याने समोर आले.
ही बातमी वाचा –मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ
आज राज्यभर जरी आंदोलन सुरु असले तरी आता राज्यात प्रहार संघटनेची असलेली पकड आणि कार्यकर्त्यांबद्दल असलेली भुमिका ही नक्कीच पुर्वीसारखी नसल्याने वाढत्या संघटनेला खिळ बसल्याचे वास्तव्य आता पहावयास मिळत आहेत. तर वरिष्ठ स्तरावरुन मिळालेली अमिषे हे सुध्दा लयास जात असल्याने प्रहार संघटनेला मुंबई मंत्रालयाजवळ देण्यात आलेल्या जागेचा ठराव सुध्दा बारगळ्यात आला असुन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बसण्याकरीता मुंबई मंत्रालयाजवळील 700 चौ फुट जागा सुध्दा महायुतीच्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी दुसऱ्या पक्षाला हस्तांतरीत केली आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
त्यामुळे बच्चु कडू यांच्या डामाडोल राजकारणाचा राज्यातील सत्ताधाऱ्यांसुध्दा त्याचा चांगला समाचार घेतल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने वा समाजाकरणाकरीता बच्चु कडू यांची काय भुमिका असणार हे आता सर्वांकरीता उत्सुकतेचे ठरणार आहे हे विशेष.
