प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई!

सद्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असतांनाच आणि अनेक न्याय निवाड्यात अडकलेल्या असतांनाही यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेगांवात प्रारंभीपासून प्रभाग क्र. 4 हा चर्चेचा ठरणारा विषय ठरल्याचे शेगांवकरांनी अनुभवले असेल. त्यामुळे या प्रभागात कोणतीच राजकीय समिकरणे यशस्वी ठरणार याचा आता कुणालाच अंदाज येईनासा झाला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

प्रभाग क्र. 4 मध्ये सिमांकन, मतदार याद्या व दुरुस्तीच्या तक्रारी या जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणुक आयोगाच्या दप्तरी पोहचल्या तर एवढेच नाही तर या प्रभागाच्या उमेदवारी दाखल करतांना झालेल्या चुकांमुळे काॅंग्रेसच्या वतीने अपात्र झालेल्या दोन्ही उमेदवारामुळे सत्ताधारी उमेदवारांना ही निवडणुक ऐकेरी वाटत असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. तर या प्रभागात प्रहार गाजविणारा निलेश घोंगे हा मागील निवडणुकीत अपयशी झाल्यानंतर सुध्दा ऐनवेळी या प्रभागात जय्यत तयारी करुनही या निवडणुकीच्या रिंगणातुन का बरे माघार घेतो याबद्दल या प्रभागातील मतदारांना न सुटणारे कोडे असतांना यावेळी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार तर काँग्रेस पुरस्कृत असलेला उमेदवार हा गड लढविण्याच्या तयारीत आहे.

 

तर यावेळी या बालेकिल्लयात यावेळी सत्ता परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सुरु असलेली लढाई आणि या प्रभागातील जातीय समिकरणे नेमकी काय भुमिका दर्शवितात हा येणारा काळच सांगेल. कारण हा प्रभाग सत्ताधारी पक्षाकडे कायम ठेवण्याकरीता स्थानिक नेतृत्व आणि या मतदार संघाचे अामदार  आणि शेगांव शहरातील या पक्षाचे दिग्गज नेतृत्व हे सर्वस्वी पणाला लावून कामाला लागणार असल्याचे संकेत दिसून येत असले तरी यावेळी काँग्रेसचे नेतृत्व यांनी सुध्दा या प्रभागाची निवडणुक ही प्रतिष्ठेची बनविली असल्याने आणि आता  सर्वस्वी वेळच या प्रभागात काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला विजयाचा गुलाल लावण्याच्या दृष्टीने काम करीत असल्याचे सर्वोतोपरी बोलल्या जात आहे.

 

ही बातमी वाचा –नव्या युगाची नवी पिढी घडविण्याचा संकल्प

 

आता शेगांव शहरातील निवडणुका आटोपल्या असून अनेकांना प्रतिक्षा लागली आहे ती दि. 21 डिसेंबरच्या निकालाची त्यातच चर्चा अनेक प्रभागातील मतविभाजनीच्या आणि विजयाच्या अंदाज बांधणाऱ्या चर्चेंना आता सर्वोतोपरी उधाण आल्याचे चित्र शेगांव शहरात असले तरी प्रलंबित असलेल्या प्रभाग क्र. 4 च्या निवडणुकीकरीता निवडणुक आयोगाच्या निकषानुसार आता या प्रभागात रंगत येत असल्याचे वास्तव्य सद्या तरी पहावयास मिळत आहे. यावेळी नव्या प्रक्रीयेनुसार समाजवादी उमेदवारने अर्ज माघार घेतला असला तरी उमेदवार हे जैसे ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

तर काँग्रेस पुरस्कृत एकच उमेदवार यावेळी या रिंगणात आहे.  तर राष्ट्रवादीचा गजर सुध्दा या प्रभागात सक्रीय आहे. तरी आता वंचित च्या माध्यमातुन दोन उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असले तरी भाजपाचा दावेदारी कायम राहणार असल्याचे चाहत्यांच्या वतीने बोलल्या जात असले तरी यावेळी या प्रभागात अनेक डावपेच आणि जातीय समिकरणाचा आधार घेता या ठिकाणी जनसामन्यांचा गोंधळ उडाला असल्याचे दिसून येत आहे. तरी यावेळी प्रभाग क्र. 4 ची निवडणुक ची प्रतिष्ठेची होवू घातली आहे.

 

वंचित च्या ओवे करीता पोषक वातावरण

प्रभाग क्र. 4 मध्ये राखीव असलेल्या अ.जा. प्रवर्गाची काँग्रेसचा उमेदवार हा अपात्र ठरला असल्यामुळे यावेळी वंचित च्या वतीने अ.जा. प्रवर्गातुन या वेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार सौ. ओवे यांच्याकरीता सामाजिक पाठबळ आणि प्रभागवासीयांची सहनुभुती ही नक्कीच विजयाचे संकेत देणार असल्याचे वास्तव्य सद्या तरी चर्चेचे ठरु लागले आहे एवढे मात्र निश्चीत!

Scroll to Top