महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या वतीने महिलांसाठी तसेच शालेय उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्याकरीता विविध योजना आणून त्यांना प्रवाहात अाणण्याचे काम सद्याच्या सरकारकडून होत आहे. महिलांसाठी एसटी प्रवास सवलत, लाडकी बहीण योजना व अन्य रोजगार साधण्यासाठी विविध योजना राबवित असले तरी उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री यांनी उच्च शिक्षणाकरीता असलेल्या मुलींना शालेय फी सवलतसाठी पुढाकार घेतला होता.
तर आता तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने 5 लाख मुलींकरीता 2 हजार रुपये मिळणार अशी मानधन योजना कार्यान्वित करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलतांना दिली.
सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी आणि अाशियातील वाणिज्य शाखेतील पहिल्याा पदवीधर यास्मिन सर्वेअर यांच्या पदवी दानाला 100 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थितांशी बोलतांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी या योजनेबद्दलची माहिती दिली आहे.
ही बातमी वाचा –Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार!
ते बोलतांना पुढे म्हणाले की, राज्यातील मुलींचे शिक्षण क्षेत्रात प्रमाण वाढावे तसेच मुलींनी जास्त संख्येेेेेने उच्च शिक्षण व तांत्रिक शिक्षणाच्या प्रवाहात याव्यात याकरीता तंत्रशिक्षण विभागाकडून नवे धोरण आखण्यात येत आहे.
विद्यार्थीनी करीता कमवा आणि शिका ही स्वतंत्र योजना राबविण्याची तयारी सूरू आहे. या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणासोबतच रोजगाराची संधी मिळणार आहे.त्या माध्यमातुन दोन हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे सांगिले तरी या निधीच्या माध्यमातुन शैक्षणिक साहित्य, दैनंदिन खर्चासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे.
तरी प्रत्येक महाविद्यालय विद्यार्थींनींना तांत्रिक काम, कार्यालयीन काम उपलब्ध करुन रोजगार देईल तशी तरतुद सुध्दा करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.

Comments are closed.