Mahaelgar Melawa Beed

नेत्यांना आवरा, अन्यथा निवडणुकीत हिशेब करु-मंत्री छगन भुजबळ

बीड- मराठा आरक्षणासंदर्भात शासनाच्या वतीने  2 सप्‍टेंबर रोजी पारीत केलेल्याआदेशाच्या विरोधामध्ये बीड येथे शुक्रवारी आेबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित ओबीसीच्या महाएल्गार सभेतून सरकारमधील  मंत्री छगन भुजबळ यांनी थेट भाजपालाच इशारा दिला. तुमच्या नेत्यांना आवरा, अन्यथा तुमचे राजकीय नुकसान कसे करायचे हे मला माहित आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही बातमी वाचा – दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी

 

होवू घातलेल्या निवडणुकीमध्ये तुमचा हिशेब करु, अशा कडक शब्दामध्ये भुजबळ यांनी भारतीय जनता पार्टीला खडे बोल सुनावले आहेत.बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर अायोजित महाएल्गार सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळावा पार पडला या मेळाव्याच्या व्यासपीठावर आ.धनंजय मुंडे, आ.गोपिचंद पडळकर, आ.कायंदे, प्रकाश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी नेत्याची उपस्थिती होती.

 

उपस्थित नागरिकंाशी संवाद साधतांना छगन भुजबळ म्हणाले की, विखे यांनी आदेशातील पात्र हा शब्द एका तासात काढला. त्यावेळी मुख्यमंत्री नागपूरला होते. यांनी परस्पर निर्णय घेतला. अाता जनता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत  आहे. तरी बीजीपेच्या नेत्यांना सागतोय की, ओबीसी मताच्या ताकदीवर आतापर्यंत 125-135 आमदार मिळाले आहेत. त्यामुळे आेबीसीवर अन्याय केला तर ओबीसी दुधखुळे नाहीत. तरी भाजपाच्या लोकांना आवरा.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

राजकीय नुकसान कसे करायचे हे मला सुध्दा माहीत आहे. आजवर खुप सहन केले,  “चूप रहकर क्या मिलता है, अाखीर दिल का दर्द पडता है, उठानी पडती है आवाज जब पानी सर से उपर चढता है ” अशा शेरो शायरीच्या अंदाजातुन भाजपाच्या नेत्यांसह ओबीसी आरक्षण धोक्यात आणणाऱ्यांना या मेळाव्यातुन इशारा दिला आहे.

 

अंगावर आला तर शिंगावर घेवू- धनंजय मुंडेचा सुचक इशारा

 

शुक्रवारी बिडमध्ये झालेल्या या मेळाव्यामध्ये आ.धनंजय मुंडे यांनी सुध्दा  आपल्या सुचक शब्द शैलीमध्ये  छाप टाकली या महाएल्गार मेळाव्यातुन धनंजय मुंडे यांनी जरांगेना चांगला इशारा दिला असून आमच्या अंगावर आला तर  शिंगावर घेेण्याची आमची तयारी आहे. आमच्या नादाला लागू नका,  असे सांगत आपले मनाेगत व्यक्त केले. आता या आंदोलनकर्त्यांनी माणसात माणूस ठेवला नाही, गावागावात जातीचे विष पेरले. छत्रपती शिवराजरांच्या राज्यात एवढे जातीपातीचे विष पेरणे कितपत योग्य आहे. आता छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहायाचे आहे. तरी एवढ्या भरसभेतही मराठा समाजाच्या तरुण तरुणंाना माझी विनंती आहे की त्यांनी ईडब्ल्युएस चा लाभ घ्यावा.

Scroll to Top