यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन!

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

विदर्भात सोयाबीन हे पिक महत्वपुर्ण असले तरी यावेळी अतिवृष्टी आणि पावसाची रिपरिप यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट आली आहे. आजची वाढती महागाई आणि महागडे बियाणे, खते आ.िण मशागात यामुळे मोठ्या अाशेवर असलेल्या पिकाच्या उत्पन्नात आलेली घट ही शेतकऱ्यांच्या जिववार  बेतणारी ठरत आहे.

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भातील अमरावती विभागात येत असलेल्या  अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या पट्टयामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात होत असते.  त्यातुन शेतकऱ्याला मोठ्या उत्पन्नाची आशा असते. परंतु यावेळी पावसाची अवेळी असलेली हजेरी ही सद्या शेतकऱ्यांना डोकेदुखीची ठरु लागली आहे. मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर सुल्तानी सकंट ओढावले असतांना ऐन पिकातील दाणे भराईच्या काळातच अपेक्षीत असलेल्या  पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीबीन पिकात मोठी घट आल्याचे वास्तव्य आज पिक काढणी दरम्यान पहावयास मिळत आहे.

ही बातमी वाचा – बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली

 

महागाईचे बी-बियाणे, पेरणी पुर्व मशागत आणि पेरणी नंतरची मशागत आणि  काढणीचा खर्च विचारात  पिक काढणीकरीता प्रति एकर 2 ते 5 हजार रुपये घरून लावण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. आणि एवढे असूनही शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाला अपेक्षीत भाव नसल्याने  सोयाबीन पिक हे शेतकऱ्यांना कर्जबाजारी असणारे पिक ठरले आहे.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन पिक विकून दिवाळी साजरी करू असा अशावाद जरी शेतकऱ्यांकडून जोपासला जात असला तरी आता सोयाबीन च्या झडतीमुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे यावेळस ची दिवाळी ही अंधकारमय असल्याचे वास्तव्य शेतकऱ्यांकडून वर्तविल्या जात आहे. हे विशेष.

Scroll to Top