SIP Investor

एसआयपी धारकांनी बाळगावा संयम;घसरणीचा काळच ठरतो सोन्यासारखा!

आजस्थितीला बहुतांशी गुंतवणुकधारकांचा एसआयपी हा महत्वपुर्ण पर्याय असून आता एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुध्दा बळावत चालली असल्याचे शेअर बाजारातील आर्थिक हालचालीच्या वृत्तातुन समोर येत असले तरी येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीने आणि गुंतवणुकीचे महत्व जाणुन अनेकांनी एसआयपी च्या माध्यमातुन गुंतवणुक वाढविली असली तरी शेअर बाजाराच्या उतार चढावामुळे एसआयपी प्रभावित होत असते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शेअर बाजारामध्ये चढ-उतार हा सुरु असतात त्यामुळे बाजाराची चाल देशांतर्गत, जागतिक, आर्थिक, सामाजिक आणि व्यवसायिक अशा विविध स्तरांच्या घडामोडीवर अवलंबुन असते.बरचेदा बाजार एकतर्फी खाली येतो अशा वेळेस गुंतवणुकदार हे पॅनिक मोडवर जातात आणि निश्चीतच इक्वीटी प्रकारातील म्युच्युअल फंड अणि गंुतवणुकदार सुध्दा अस्वस्थ होतात. कारण बाजार खाली आल्यावर फंडाची एनएव्ही खाली येवून शुध्द मालमत्ता मुल्य कमी होते.

एसआयपी बंद करावी का?

शेअर बाजारातील आर्थिक हालचाली पाहून अनेकदा एसआयपी बंद करावी का? असा सवाल उपस्थित केला जात असला तरी त्याबाबत जाणकारांचे ठाम उत्तर नाही असे आहे. बाजार जसा खाली येतो. तेव्हा गुंतवणुकीच्या संधी अधिक असतात आणि खाली अालेल्या एनएव्ही दरामध्ये जास्त युनिटस मिळतात. बाजार जसा जसा खाली येईल त्यानुसार जास्त युनिटस जमा झाल्याने भविष्यात जेव्हा पुन्हा बाजार तेजीत जातो तेव्हा गुंतवणुकदाराच्या मालमत्तेत सुधण्दा वाढ होते. तरी जे गुंतवणुकदार भावी काळाचा विचार करुन दीर्घ कालावधीच्या एसआयपी बंद न करता गुंतवणुक सुरु ठेवतात त्यांना अार्थिक फायदा अधिक होण्याची शक्यता जास्त असते. तरी शेअर बाजारामधील नकरात्मक बातम्यांवर प्रतिक्रीया देणे टाळा, एसआयपी ची गुंतवणुक ही भावी काळाकरीता जसे सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण, घर आदी असल्याने ही गुंतवणुक कायम ठेवणे नक्कीच फायद्याचे ठरते.

 

ही बातमी वाचा – हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलण्याची शक्यता!

 

स्टेप- अप घेतल्यास फायदा होतो का?

प्रत्येक वर्षी अथवा ठरावीक मुदतीत एसआयपी रक्कम वाढविण्याच्या पर्यायास स्टेप अप असे म्हणतात. घटत्या बाजारात एसआयपी स्टेप अप असेल तर त्या कालावधीमध्ये जास्त रक्कम गुंतवली जाते त्यामुळे जास्त युनिटस् मिळतात आणि येणाऱ्या भावी काळात बाजारात तेजी अाल्यास त्या परिणाम एसआयपी च्या स्टेप अप घेणाऱ्या धारकांना नक्कीच होतो.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

या वृत्तामधून तसेच एसआयपी गुंतवणुकदारांचे सल्लागार असणाऱ्यांकडून मिळालेल्या ज्ञानाचे सार इतकेच की, एसआयपी ही सुरु ठेवावी, बाजारातील तेजी-मंदीचा विचार न करता आपले ठराविक उद्दीष्ट साध्य होईपर्यंंत गुंतवणुक सुरु ठेवावी.

 

Scroll to Top