बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश

राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला असून यावेळी झालेल्या परिक्षामध्ये अपार कष्ट करणाऱ्या परीक्षार्थींनी बाजी मारली आहे.त्यामध्ये बुरुंगले हायस्कुल शिक्षण घेतलेल्या शुभांगी पातोडे हीने सुध्दा एक दोन वेळा नव्हे तर तिसऱ्यांदा या कठीण्य पातळीच्या स्पर्धेत यश मिळविले आहे. तिचे कौतुक होणे हे सुध्दा तितकेच वाजवी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शुभांगी ही अकोला जिल्हयातील आकोट तालुक्यातील रौंदळा या गावात असुन वडील डिगांबर पातोंडे हे अल्पभुधारक शेतकरी आणि घरची खडतर परिस्थती असतांना सुध्दा तिची चिकाटी आणि स्पर्धा परीक्षेचे सातत्य असल्याने तिने हे तिसऱ्यांदा यश मिळविले आहे.

छोट्याश्या रौंदाळा गावामध्ये मराठी शाळेतुन प्राथमिक शिक्षण घेतले आर्थिक परिस्थीती नाजुक असल्याने शेगांव येथे रहिवासी असलेले मामा निवृत्ती मते यांच्या सहवासात राहुन बुरुंगले शिक्षण संस्थेतुन 12 वी पर्यंत चे शिक्षण घेतले. आणि त्यानंतर आकोट येथील महाविद्यालयातुन बीए पदवी प्राप्त करता बरेाबरच 2018 साली पहिली एमपीएससी ची परीक्षा दिली.आणि त्यातही यश मिळविले आणि ती पहिल्यांदाच रेल्वेचा प्रवास करीत मुंबईला गेली. कल्याणला नातेवाईकांच्या सहकार्याने मुंबईच्या कार्यालयात रुजु झाली. तिने रेल्वेच तिच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली.

 

ही बातमी वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल…

मुंबईत नोकरी करीत असतांना सुध्दा तिने स्पर्धा परीक्षेची जिद्द आणि चिकाटी कायम ठेवीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुच ठेवला आणि दुसऱ्यांदा दिलेल्या स्पर्धा परीक्षेत तिने सेलटॅक्स विभागाची स्पर्धा परीक्षा देवून मुंबई येथील कार्यालयात सेलटॅक्स अधिकारी म्हणून नोकरी वर लागली तरी मोठे ध्येय उराशी बाळगून तिने आत्मविश्वासाने प्रथम श्रेणी पदाकरीता महसुल विभागाची परीक्षा दिली असून ती तिसऱ्याही प्रयत्नात तिने यश मिळविले आहे. त्यामुळे तिची यावेळी नक्कीच तहसिलदार पदावर नियुक्ती होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.

शुभंागी ही अत्यंत हालाखीच्या परीस्थितीमधुन शिक्षण घेतांना तिने जिवनाच्या वाटेत यश मिळविण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अग्निपरीक्षा एक दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा सुध्दा पार केली असल्यामुळे सातत्यपुर्ण सरावातुन तिने गरीबी, लाचारी,दारिद्रयता यावर मात केली आहे. आज स्थितीला कु.शुभांगी चा भाऊ गणेश हा d.farm झाला ,लहान बहीण ग्रॅज्युएट झाली आणि आता अकोट येथे mpsc चा अभ्यास करीत आहेत.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

सातत्य ठेवून अभ्यास केल्यास नक्कीच यश प्राप्त होते हे शुभांगी ने सिध्द करून दाखविले तरी कु.शुभांगी पातोंडे हीने मिळविलेले यश ही तिच्या कर्तव्यतत्परतेचे पावती आहे. भावी काळातील वाटचालीत तीने उत्तरोत्तर प्रगती करावी करीता जनसमूह परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा..

Scroll to Top