Shrikrushana Janmastove

श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

शेगाव :-दि.१६ प्रतिनिधी
श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पारंपारिक पद्धतीने उत्साहात ब्रह्म वृंदांच्या मंत्र उपचारात व सनई चौघडयांच्या  निनादात गुलाब पुष्पांची उधळण करत अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करीत  श्रीकृष्ण जन्मोत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त भजन रात्री ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत व  रात्री १० ते १२ कीर्तनकार श्री प्रमोदबुवा राहाणे, पळशी यांचे किर्तन झाले .शेकडो भाविकांनी कीर्तन श्रवण केले. या कीर्तनाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती होती.

ही बातमी वाचा- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार

त्यानंतर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सुशोभित पाळण्यात श्रीकृष्ण नामाचा जयघोष, जय गजानन श्री गजानन , श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या मंत्राचा नाम जप करत , शंखनाद गोपाळ कृष्ण भगवान की जय  करत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविक भक्तांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले व भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला.

आकर्षक सजावट

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रींच्या मंदिरात ठिकठिकाणी आकर्षक फुलांची सजावट व मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानांचे तोरणे लावण्यात आले होते.

Scroll to Top