संत कबीर चेस ॲकडमी च्या दोन खेळाडुंची दमदार कामगिरी
शेगंाव- आजच्या युगामध्ये बुध्दीमत्तेला अत्यंत महत्व असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये संत कबीर चेस ॲकडमीच्या दोन खेळाडुंची विभागस्तरावर अश्विन माने (फाइड रेटींग 1443)अद्वित हरलालका (फाइड) यांची निवड झाल्याबदद्ल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मागील 4 ते 5 वर्षापासून शेगांव शहरात सुरु असलेल्या संत कबीर चेस ॲकडमीचे संचालक भुषण दिलीप काळे हे या क्षेत्रात आपल्या अनुभवाच्या आधारावर बुध्दी बळाच्या पटावर अापला विजय कसा मिळवावा याचे प्रशिक्षण आपल्या कुशल बुध्दीमत्तेच्या आधारे देत आहेत.
ही बातमी वाचा –शेगांव येथे स्व.श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
या ॲकडमीचा खेळाडु कबीर भुषण काळे अवघ्या दहाव्या वर्षाचा असून त्याने बुध्दी बळाच्या स्पर्धेत तब्बल 16 सन्मान चिन्हे, कॅश प्राईजेस व 35 गोल्ड मेडल्स मिळविले आहे. तरी संत कबीर चेस ॲकडमी ही बुध्दीबळ स्पर्धेकरीता मार्गदर्शन करणारी शेगांवातील संस्था असून या संस्थेत इच्छुकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन संचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.