महाराष्ट्राच्या राजकारणासोबत देशाच्या राजकारणात अग्रेसर असलेले नाव म्हणजे शरद पवार आणि विशेष म्हणजे सत्ता असो वा नसो परंतु नेहमीच राजकारणाच्या पटालावर आपलं अस्तित्व कायम ठेवणार नाव म्हणजे शरद पवार यांच्याकडे पाहिलं जाते. त्यांचा नुकताच 85 वाढदिवस सर्वस्तरावर चाहत्यांच्या व विरोधकांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या भावी आयुष्याकरीता व नवतरुण्याच्या भुमिकेला सलामच
बारामती मध्ये जन्माला आलेले शरद पवार हे नक्कीच एक विचार असल्याचे वास्तव्य आता कोणीही नाकारु शकत नाही. तरी सर्व सामान्य माणसाने सुध्दा शरद पवार यांची संघर्ष वृत्ती जोपासणे वावगे ठरणार नाही.
पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून ते देशाचे संरक्षण मंत्री तसेच कृषी मंत्री पदासोबत आजवरच्या राज्यसभा सदस्याच्या असलेल्या संघर्ष काळात जिवनातील आलेल्या अडीअडचणीवर मात करण्याचे काम त्या व्यक्तीने सातत्याने केले आहे. त्या शरद पवाराबद्दल चाहत्यांसमावेतच विरोधकांना सुध्दा त्यांच्यासोबत संबध ठेवण्याचा अभिमान जाणवावा अशी कृतीशिलता जोपासणारा नेता शरद पवार हे सर्वश्रृत आहे.
वयाच्या साठीनंतर स्वाभिमाना खातीर सत्ताधारी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस करणारे शरद पवार यांची भुमिका त्या साठीत ही चक्क 21 वर्षाच्या तरुणाइतकी कणखर असल्याचे वास्तव्य संपुर्ण महाराष्ट्रासह देशाने अनुभवले. स्वतंत्र पक्षाची स्थापना राज्यात करुन सत्ता स्थापनाकरीता घेतलेली भुमिका ही खराेखरच वाखणण्याजोगी असल्यामुळे जिवनात काहीच अशक्य नसल्याचा उजाळा त्यंानी त्यांच्या कतृत्वशैलीतुन सिध्द केला आहे. पक्षाची स्थापना आणि त्यानंतरही सत्ता केंद्राशी सातत्याने जुळत राहणारे शरद पवार यांनी कधीच कुठलीच कमतरता ठेवली नाही.
ही बातमी वाचा – प्रभाग क्र.4 च्या प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान!
राजकीय पटलासोबतच जुन्या संबधाची असलेली आपुलकी क्षेत्र कुठलही असो परंतु त्यांचा गाढा अभ्यास आणि जपलेली नाती हे सहज शक्य नाही. पुरोगामी विचारधारा जोपासत असतांना हिंदुत्व जोपासणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यासमावेत असलेली मैत्री ही संपुर्ण देशात एक आगळावेगळा अनुभव देणारी असली तरी त्याचे गोडवा आपणास प्रसार माध्यमातुन पहावयास मिळतात.
मानवी देह हा सुखदुःखाचा असला तरी त्यावरही मात करता येवू शकत हे शरद पवार यांच्या धाडसी आत्मविश्वासातुन समोर येते. वयाच्या 60 वर्षानंतर सेवानिवृत्ती जोपासण्यात धन्यता मानत असले तरी शरद पवार यांच्या आयुष्याची नवी दिशा ही वयाच्या साठीनंतर त्यांनी सुरु केली ती राष्ट्रवादी पक्ष स्थापन करुन एवढेच नाही तर पक्ष स्थापनेनंतर त्यांना अंतिम टप्प्यातील कर्करोगाची लागण झाल्यावरही त्यातुन शस्त्रक्रीया पार पडल्यानंतर अनेक आरोग्य तज्ञांच्या अंदाजाला कलाटणी देण्याचे काम शरद पवार यांनी त्यांच्या आत्मविश्वास आणि सकारात्मकेतवर मात करीत आजही वयाच्या 85 व्या वर्षी तरुण्याची भुमिका त्यंाच्या शैलीतुन जाणवत असते. जिवनात गऱ्हाणे न मांडता आलेल्या सर्व समस्यावर मात करण्याकरीता त्यांची भुमिका हा नवा आदर्श आहे. तरी शरद पवार यांच्या जिवनशैलीतील कर्तव्यदक्षता आणि कार्यपध्दती हीच आजस्थितीला खरा आदर्श आहे. त्या व्यक्तीमत्वाला शुभेच्छा देण्याकरीता सर्व स्तरावरुन होत असलेला वर्षाव हा नक्कीच अतुलनीय अाहे.
तरी अपयशाला बगल न देता सर्वोतोपरी त्यावर मात करीत आणि कुजबुजलेल्या विचारधारेला दडपण्याची त्यांची भुमिका ही नक्कीच आगळेवेगळी असल्याने त्यांच्या कार्यपध्दतीला हा सलाम
