नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता!

जातीय समिकरणाच्या सखोल अभ्यासातुन होणार उमेदवारी निश्चीत!

शेगांव नगर परिषदेकरीता यावेळी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अ.जा. प्रवर्गाकरीता सुटले असल्याने यावेळी कोणत्या उमेदवाराची निश्चीती करावी हा राजकीय पक्षांना पेच पडला आहे. शहरातील अ..जा. प्रवर्गांमध्ये मोडत असलेल्या कोणत्या समाज घटकाला प्राधान्य द्यावे याबाबत अनेकांचा गोंधळ उडत असला तरी अ.जा. प्रवर्गाच्या नगराध्यक्ष पदाकरीता वंचित बहुजन आघाडीची भुमिका ही निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत समाेरे येवू लागले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

अर्ज प्रक्रिया सद्या सुरु नसली तरी शेगांवात जास्त मताधिक्य संभाळणाऱ्या पक्षांकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा अद्याप निश्चीत नसल्यामुळे इच्छुकांमध्ये सुध्दा धुकधुक वाढीस लागली आहे. यावेळी शेगांव नगर पालिकेसोबत जळगांव जामोद मतदार संघातील जळगांव जामोद येथील नगरा पालिकेकरीता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अजा प्रवर्गाकरीता निश्चीत करण्यात आले असल्याने यावेळी भारतीय जनता पार्टी च्या वतीने नेमकी अ जा प्रवर्गातील कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करावी असा पेच असल्याचे बोलल्या जात आहे. तरी यावेळी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मित्र पक्षांची कुठलीच बोलणी झाली नसल्याने यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि काँग्रेस च्या मताधिक्क्याचा विचार करता दुहेरी लढतीचे चित्र आता चर्चेत येवू लागले आहे.

ही बातमी वाचा –दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी

 

तर यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पार्टी सुध्दा यावेळी नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवक पदांच्या लढाई करीता सज्ज अ सल्याचे संबधित नेत्यांनी बोलतांना सांगितले असल्याने यावेळी होणारी निवडणुक ही चुरशीची होणार असे बोलल्या जात आहे. तरी काँग्रेसचे शहरातील मताधिक्य आणि जातीय समीकरण पाहता वंचित बहुजन आघाडी ही संयुक्तरित्या लढणार की, स्वतंत्र लढण्याची तयारी करणार यावर नक्कीच परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

तर मागील निवडणुकीमध्ये एमआयएम ने नाविन्यपुर्ण मताधिक्य मिळवित आपले मताधिक्क्याचे असित्व सिध्द केले असले तरी यावेळी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक नेतृत्वात तशी तत्परता दिसून आली नसल्याने यावेळी निवडणुकीत अर्ज प्रक्रीयेपर्यंत काय बदल होतात हा येणाराच काळ सांगेल असे सुध्दा आता बोलल्या जावू लागले आहे. आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठी समोर मोठा गांेधळ असल्याचे जाणवते.

Scroll to Top