शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाला असून होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जनउत्सवामध्ये समाजवादी पार्टीचा सक्रीय सहभाग असून सर्वच प्रभागातुन 30 नगरसेवक पदाचे उमेदवार लढविणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाकरीता समाजवादी पार्टी रिंगणात उतरणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष सलीम उमर यांनी आज त्यांच्या आठवडी बाजार येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
या अगोदरही मी काँग्रेसच्या माध्यमातुन निवडणुक लढवून नगर पालिकेच्या सभागृहात पोहचलो असलो तरी यावेळी समाजवादी पक्ष हा पुरोगामी विचारधारेशी जुळलेला पक्ष असून या निवडणुकीमध्ये इतर कोणतेही पक्ष जुळल्यास युती करण्यात आमची कुठलीच हरकत नाही.
ही बातमी वाचा – मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि राजकीय पक्षाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे
समाजवादी पार्टीच्या वरीष्ठाने स्थानिक निर्णयाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. तरी आता होणाऱ्या या निवडणुकीसाठी शेगांव शहरात नव्या चेहऱ्यांना संधी मिळविण्याकरीता समाजवादी पार्टी तत्पर असल्याने आतापर्यंत इच्छुकांच्या माझ्याकडे भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.
तरी 17 नोव्हेबरच्या आगोदर समाजवादी पार्टीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येणार असल्याचे मत शहराध्यक्ष सलीम उमर यंानी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तर यावेळी स्थानिक विशेषतः दलीत व आर्थिक दुर्बलाकरीता आरोग्य सेवा हा महत्वपुर्ण अजेंडा असून गोरगरीबांच्या रुग्णसेवेला आमचे प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तर आजच्या वाढत्या महागाईमुळे गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी स्थानिक प्रशासनाच्या शाळा सोयीच्या करणय्याची प्रतिक्रीया त्यांनी जनसमूुहशी बोलतांना दिली.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
तरी आता यावेळी होणाऱ्या निवडुकीत समाजवादी पार्टी ही नक्कीच सर्व जागा लढविणार असून युवा आणि उच्चशिक्षीतांना यावेळी उमेदवारी देणार असल्याचे संागितले.
