महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या वतीने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याच्ा हप्ता त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटीचा निधी मंजुर झाला. त्यामुळे दिवाळी सण असल्याने आता महिला ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे.
कारण दिवाळी सण हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने आणि या महिन्यात माहेरी जाणे येणे व इतर वस्तु खरेदी करण्याच्या दृष्टीने आर्थिक हालचाली मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरी लाडक्या बहीणींना ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा लागुन राहिली आहे.
ही बातमी वाचा –उच्च न्यायालय भरती-नागपुर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठासाठी किती असणार जागा
ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता हा कदाचित या महिना अखेरपर्यंत येवू शकतो अशी माहिती समोर आली आहे. कारण दिवाळी हा महाराष्ट्राकरीता महत्वपुर्ण सण आहे. त्याकरीता सत्तेवर असलेले महायुती सरकार महिना अखेर पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होवू शकतात. आणि याबाबत मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी केवायसी अनिवार्य
महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ घेण्याकरीता ई- केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आजवर लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तरी ज्या महिलांना लाभ मिळणे बंद झाले असेल त्यांनी सुध्दा ई-केवायसी करुन घ्यावी. आतापर्यंत या योजनेतील 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी ई- केवायसी केली आहे. तरी सद्या ई=केवायसी बाबत आलेल्या अडचणीवर तोडगा काढला जात असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
