चतुर्थतश्रेणी नाकरताच महसुल सेवकांचा ह्‍दयविकाराने मृत्यु; राज्यातील महसुल सेवक शोकाकुल

महसुल विभागामध्ये मागील अनेक वर्षापासून महसुल सेवक (कोतवाल) पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी देण्यासोबतच इतर मागण्यासह महसुल सेवकांच्या संघटनेच्या वतीने आंदोलनाचा लढा सरुु होता. परंतु 16 ऑक्टोंबर रोजी महसुल मंत्री यांनी चतुर्थश्रेणी नाकारताच महसुल सेवक गोपाल बेलदार (29 वर्षे) रा. साजा थेरोळा, ता.रावेर,जि.जळगांव यांचा ह्‍दयविकाराच्या तिव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यु झाला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा लाभ नाकारण्यात आल्याची माहिती मिळताच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महसुल सेवक गोपाल बेलदार हे संघटनेच्या अांदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणारेे , कार्यतत्पर आणि निष्‍ठावंत होते. नागपुर येथे सुरु असलेल्या आंदोलनात तब्बल एक महिना ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या आंदोलनात महसुल मंत्री बावनकुळे यांनी भेट देवून चतुर्थ श्रेणीची मान्यता देण्याचे आश्वासन दिल्याने महसुल सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु दि. 16 ऑक्टोंबर रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सचिवांनी महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा देता येणार नाही असे स्पष्ट केल्याची माहिती मिळताच बेलदार यांना तिव्र मानसिक धक्का बसला आणि काही क्षणातच त्यंाना ह्‍दयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

ही बातमी वाचा – बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली

महसुल सेवक गोपाल बोरकर हे अविवाहीत होते त्यांच्या भावाने सांगितल्याप्रमाणे गोपाळ हा मुंबईच्या बैठकीला जात होता. चतुर्थ श्रेणी मंजुर झाल्यावर बँकेचे कर्ज काढून घर बांधायचे त्याचे स्वप्न होते पण बँकेने देखील किमान 25 हजार पगार असेल तर कर्ज मिळेल आणि शासनाने नकार दिल्यानंतर त्याने खुप तणाव घेतला आणि त्याचा जिव गेला.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

या घटनेमुळे महसुल सेवक वर्गात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता संघटनेच्या वतीने शासनाला मागणी केली आहे की, आता तरी शासनाने महसुल सेेवकांना न्याय देत चतुर्थ श्रेणी मंजुर करावी तसेच स्व.गोपाल बेलदार महसुल सेवक यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी.

महसुल सेवक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही एक समर्पित व कर्तव्यनिष्‍ठ सहकारी गमावला आहे. ही घटना संपुर्ण महसुल विभागासाठी अत्यंत दुःखद आहे. तरी या घटनेमुळे तसेच महसुल सेवकांची मागणीचे आश्वासन देवूनही चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य न केल्यामुळे महसुल सेवकांची दिवाळीत अंधाराचे सावट

Scroll to Top