महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री हे कणखर आणि आपल्या शैलीत दमदार असल्याचे वास्तव्य प्रसारमाध्यमातुन अनुभवयास येत असतांना नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार हे सोलापुरात अवैध रेती उपसाविरुध्द कारवाई करणाऱ्या महीला आयपीएस अधिकाऱ्यावर ती कारवाई थांबविण्यात यावी यासाठी दबाव आणित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी अजित पवार यांची बाजू संभाळण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. अजित पवार यांच्या वक्तव्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत आज नागपुरात चंद्रकांत बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची बाजु संभाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की, फोन कॉलच्या बाबतीत सांगायचं जर झाल तर कधी कधी त्यावेळी दुसरीकडून बोलणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल चे प्रकरण काय आहे हे माहित नसंत अनेकदा माझ्या बाबतीत अस झाल्याचं त्यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा –कामगारांच्या कामाच्या तासात वाढ- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
एकीकडे अधिकारी सांगतात की, ते बेकायदेशीर आहे. तर कार्यकर्ते संागतात की, ते अधिकृत आहे. त्यामुळे वादग्रस्त घटना निर्माण होतात. तरी मला वाटत अनाधिकृत कामाकरीता अजित पवार कोणत्याही अधिकाऱ्याला ओरडणार नाहीत. ते असे नेते नाही आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांला न्याय देण्याची भुमिका बजाविण्यासाठी हा कॉल केला असला तरी हे प्रकरण अनाधिकृत असल्याचे त्यांना ज्ञात नसावे.
तरी अजित पवार यंाच्या व्हायरल व्हिडीओबाबत विरोधकांडून सद्या टीका जोमात सुरु आहे. त्यावर माहिती देतांना महसुल मंत्र्यांनी संागितलेे. की, त्या परिसरातील स्थानिकांकडून अवैध रेती उपश्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर आपीएस अंजली कृष्णा यांनी घटनास्थळावर जावून कारवाई केेली.