महाराष्ट्र राज्यात सद्या निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून यावेळी महायुती असलेले केंद्रीय मंत्री यांनी भाजपाला वारंवार विनंती करुनही युतीमध्ये रिपाईला मुंबईकरीता एकही जागा सोडली नसल्याने आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाई गटाच्या एकुण तब्बल 39 उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई आठवले गटाला उमेदवारी द्या अशी मागणी केली असली तरी जागावाटपाच्या बाबतीत युतीने कोणतीच दखल घेतली नसल्याकारणाने यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कणखर भुमिका घेत यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत तब्बल 39 उमेदवार उभे करुन महायुतीच्या दोन्ही पक्षांना धक्का दिला आहे. कारण महायुतीने माझ्या पक्षासोबत धोका केला असल्याचा आरोपच केला असल्यामुळे या निवडणुकीत रिपाइ आठवले गटांच्या उमेदवारांमुळे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला नक्कीच त्रास होवू शकतो त्या अनुषंगाने दोन्ही पक्ष काय भुमिका घेतात.
जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईला भाजपा गटातुन जागा देण्याच्या सूचना दिल्या असतांना सुध्दा रिपाई गटाला एकही जागा मिळाली नसल्यानंतर अर्ज प्रक्रीयेच्या अंतिम टप्प्यात रामदास आठवले यांच्या वतीने राजकीय बॉम्ब टाकला आहे तरी तरी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी रिपाई आठवले गटाची 39 उमेदवारांची यादीच जाहीर केल्यामुळे भाजपा आणि शिेंदे यांना झटका मानला जात आहे.
हे पण वाचा… अण्णाभाऊ साठे महामंडळाची एक लाख कर्ज प्रकरण योजना
मुंबईतील आंबेडकरी विचारांचा व आठवले यांना चाहता असलेल्या विशीष्ठ भागामध्ये रामदास आठवले यांच्या चाहत्यामुळे समाज हा महायुतीच्या पाठीशी राहिला होता परंतु आता यावेळी रामदास आठवले यांनी यावेळी एक दोन नव्हे तर तब्बल 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने महायुतीला नक्कीच धक्का बसला असून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याचे नाकारता येत नाही.
भाजपा आणि शिंदे गटाच्या वतीने या होणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपाई गटाला सात जागा देण्याचे आश्वस्त केला असताना अंतिम यादी प्रकाशित झाली असली तरी रिपाईला कुठलेच स्थान न दिल्यामुळै रामदास आठवले यांनी यावेळी ही निवउणुक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. तरी आता यावेळी महानगर पालिकेसाठी असलेल्या नगरसेवकाच्या विजयासाठी 100 -200 मते सुध्दा निर्णायक ठरत असतात. आणि मुंबईत रामदास आठवले यांचा आंबेडकरी विचार धारा असणाऱ्या अनेक प्रभागात चांगला प्रभाव आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेना शिंदे गटाची काय भुमिका असणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे हे विशेष.
उमेदवारांची यादी
- स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
- रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
- बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
- सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
- रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
- दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
- ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
- प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
- संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
- संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
- निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
- गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
- विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
- मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
- श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
- मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
- नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
- सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
- विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
- नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
- विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
- रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
- राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
- हेमलता सुनिल मोरे- ११८, ईशान्य मुंबई
- राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
- भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
- सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
- यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
- अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
- रेश्मा अबु खान, ५४ उत्तर मुंबई
- छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
- अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
- जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
- बाबू अशापा धनगर, ६३- उत्तर पश्चिम
- वंदना संजय बोरोडे, ३८- उत्तर पश्चिम
- राधा अशोक यादव, ३९- उत्तर पश्चिम
- प्रेमलता जितेंद्र शर्मा, ४०- उत्तर पश्चिम
- धनराज वैद्यनाथ रोडे,४३- उत्तर पश्चिम
- शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150
