पुंगनुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा जगातील सर्वात लहान उंचीचा गोवंश मानल्या जातो. आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्याच्या नावाने हा गोवंश ओळखल्या जातो
भारतातील आंध्र प्रदेशातील पुंगनूर येथून उगम पावणारी पुंगनूर गाय जगातील सर्वात लहान कुबड असलेल्या जनावरांपैकी एक मानली जाते, जी तिच्या लहान आकार आणि सौम्य स्वभावासाठी ओळखली जाते.
ही बातमी वाचा –प्रभाग क्र.4 मध्ये वारं फिरणार…!
सरासरी, एक पुंगनूर गाय दररोज सुमारे ३-५ लिटर दूध देऊ शकते. हे दूध अत्यंत पौष्टिक, चरबीयुक्त आणि A2 बीटा-केसिन प्रथिनेयुक्त असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
या गोमाता साधारण २ ते २.५ फुट उंची थोडी कमी जास्त प्रमाणात असू शकतात याची दुध देण्याची क्षमता १.५ ते ३ लिटर असून FAT चे प्रमाण इतर भारतीय देशी गोवंशा पेक्षा जास्त आहे पांढरा, राखाडी,काळी कपिला ,काळा , पांढरा शरीरावर चट्टा अशा रंगात पाहण्यासाठी मिळतात आपण यांचे संगोपन आपल्या राहत्या घरी म्हणजे सोसायटी, बंगला,शेतावर अगदी कंपनी,अशा कुठल्याही जागेवर संगोपन सहजपणे करू शकतो.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
यांना सुका व ओला चारा रोज दोन्ही वेळेस ४ते ५ किलो व पोषक आहार १ ते १.५ किलो गोमातेचे वजन व वय या नुसार कालांतराने कमी जास्त करावे लागते त्यामुळे दुध व तिच्या आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी मदत होते
आपण आपल्या घरामध्ये श्वान (कुत्रा) पाळणया पेक्षा पुगनुर गायीचे संगोपन केल्यास आपल्या परिसरातील वातावरण आनंदीमय व रोज आपल्या स्वतःच्या गोमातेचे निरसे ताजे दूध व ईतर पंचगव्य उत्पादन आपल्या घरी मिळवून लाभ घेऊ शकतो या व अशा असंख्य आपल्या आरोग्यासाठी व आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडीत गोष्टीचा फायदा मिळवू शकतो
